Gautami Patil on her struggling days: नृत्यांगना गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तिच्या एका कार्यक्रमासाठी आयोजक लाखो रुपये मोजण्यास तयार असतात. मात्र गौतमी पाटीलच्या यशामागे खूप मोठा संघर्ष दडला आहे. वयाच्या 16-17 व्या वर्षीच तिने आपल्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. एक काळ असा होता जेव्हा 5 हजार रुपये पाहून तिची आई आनंदी झाली होती. झी 24 तासच्या 'टू द पॉइंट विथ कमलेश सुतार' मुलाखतीत तिने आपला हा संघर्ष उलगडून सांगितला आहे.
"पैसा मिळत गेल्याने मी करत गेले. पैसा खूप महत्त्वाच होता. घरात कमावण्यासाठी कोणी नव्हतं. आईचा अपघात झाला होता, सगळं थांबलं होतं. नंतर सुरळीत झालं आणि या क्षेत्रात आले. मी घरात कमावती एकटी होते आणि आताही एकटीच आहे," असं गौतमी म्हणाली.
"5 हजार रुपये कमावल्याचं पाहून आई एकदम खूश झाली होती. तो दिवस मला आठवतो. ती फार मोठी गोष्ट होती. पैशांमुळे मी थांबले नाही, कार्यक्रम करत गेले. जिथून आले तिथले कार्यक्रम करत गेले. मी शून्यातून सुरुवात केली. माझ्याकडे काहीच नव्हतं. गावाकडून वडिलांना घेऊन गेले. आईचीही तळमळ होती की मुलगी मोठी झाली आहे. पुण्यात आजोबांनी भांडी दिली. गॅस सिलेंडर आणि सिंगल रुम होती. वडील थांबले नाहीत. शहरात राहणं सोपं नाही. तशा स्थितीत माझी आई उभी राहिली. मी आता गावाकडे जाणार नाही असं ती म्हणाली होती. ती खंबीर राहिली. आई पार्ट क्लीन करायचे काम करायची. बिस्लेरीत पण आईने काम केलं," असा संघर्ष तिने उलगडला.
लावणी सुरु केल्यानंतर कुटुंबीयांचा विरोध होता असंही तिने स्पष्ट सांगितलं. "हे चुकीचं आहे सांगत सगळ्यांनी विरोध केला. सगळ्यांचा विरोथ होता की हे चुकीचंच आहे. नाहीच करायचं असं नाही बोललं कोणी. आता तू कार्यकम करायचं नाही असं कोणी बोलणारं नव्हतं. कारण मी मी स्वत:च्या जीवावर होते. मी स्वत: पैसा कमावला, घर घेतलं. त्यामुळे बंद असं कोणी सांगू शकत नव्हतं. तुम्ही माझं घऱ चालवणार आहे का? असं विचारायचे तेव्हा बोलणारे मागे जातात. मी नाही थांबले, करत गेले. नंतर आईचा पाठिंबा मिळाल्यानंतर कोणाचं काही देणं घेणं नाही. आईपण हे काय करत आहे म्हणाली. पण नंतर समर्थनही तितकंच दिलं".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
WI
(20 ov) 195/4
|
VS |
IND
199/5(19.2 ov)
|
| India beat West Indies by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ZIM
(20 ov) 153/7
|
VS |
SA
154/5(17.5 ov)
|
| South Africa beat Zimbabwe by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.