Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यंटकांमध्ये दहशतवादी हल्ला झाला. ज्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी झी 24 तासची टीम पोहोचलीय. दहशतवादी कुठून शिरले. त्यांनी कसा गोळीबार केला. आणि त्यावेळी नेमकी काय अवस्था होती. झी न्यूजने या सर्वाचा ग्राऊंड झिरोवरून आढावा घेतलाय.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला जिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्या ठिकाणी निष्पाप पर्यंटकांना दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळ्या घातल्या त्या बैसरन घाटीमध्ये या हल्ल्याच्या जखमी आजही ताज्या आहेत. विस्कटलेल्या खुर्च्या या हल्याच्या कटू आठवणी सागताहेत. जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग या दहशतवादी हल्ल्याची भयानकता सांगतायत. पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये एक निरव शांतता पसरलीय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर झी मीडियीचे प्रतिनिधी अश्निनी पांडे पहलगाममधील घटनास्थळी पाहोचलेत. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 27 पर्यंटकांची निर्घूण हत्या केली होती.. सध्या पहलगामच्या या बैरसन घाटीमध्ये दिसणारी ही दृष्य त्या दिवशी जालेल्या नरसंहाराची कहाणी सांगताहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये आपल्या कुटुंबियांसोबत सहलीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या अनेकांवर दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. ज्यात 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पहलगामची बैसरन घाटीचा परिसर हा घटदाट जंगलाने वेढलेलाय.. ज्यामुळे दहशतवाद्यांना लपण्याची आणि पळ काढण्याची चांगली संधी मिळाली. त्यामुळे हल्ल्यानंतर सर्व दहशतवाद्य़ांनी या जंगलातूनच पळ काढला. ज्यामुळे लष्कराच्या जवानांना त्यांचा शोध घेणं कठिण झालं..
दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी 22 एप्रिलला याच ठिकाणी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. आणि या घाटीमध्ये मौजमस्ती करणारे पर्यंटकांमध्ये एकच घबराहट पसरली. यावेळी पर्यंटकांसोबत काही स्थानिक व्यावसायिकही होते. हल्ल्यानंतर पर्यंटकांसोबत त्यांनीही जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू केलीय. पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या वेळी जी परिस्थिती होती.. आजही या घाटीत तिच अवस्था आहे. सगळं काही अस्ताव्यस्त. उद्ध्वस्त झालेलं.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थलावरून आमची टीम पोहोचली ती या रस्त्यावर. जिथून सर्व पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी पळाले होते. दहशतवादी किश्तवाड आणि कोकरनागमार्गे बैसरन घाटीमध्ये घुसले. जी घाटी जंगल आणि डोगराळ रस्त्यांच्या पलिकडे आहे. आतापर्यंतच्या तपासानुसार ही माहिती समोर आलीय. पहलगाममधील बैरसन घाटी हा मोठा टुरिस्ट पॉईंट आहे आणि त्यामुळेच दहशतवाद्यांनी इथे हल्ल्याचा कट रचला असल्याची माहिती मिळतेय.