close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज

गणेश विसर्जनासाठी पालिका, पोलिस सज्ज

सोमवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. 

Sep 7, 2014, 11:45 PM IST
बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार

बाप्पा गावी जाणार, नंतर आचारसंहिता येणार

गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारी याबाबतची घोषणा होऊ शकते. तर मतदान ९ ते १५ ऑक्टोबर दरम्यान दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 

Sep 7, 2014, 11:18 PM IST
विसर्जन सोहळ्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्था

विसर्जन सोहळ्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्था

गेले दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतोय. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर उद्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

Sep 7, 2014, 10:28 PM IST
बाप्पाचे चक्क आता सिक्स पॅक अॅब!

बाप्पाचे चक्क आता सिक्स पॅक अॅब!

तुंदिलतनू गणपती बाप्पानंही आता चक्क सिक्स पॅक अॅब बनवलेत. अंधेरी येथील एका मंडळानं यंदा सिक्स पॅक अॅब असलेला गणपती बसवलाय. केवळ गणपतीच नव्हे, तर गणपतीची पूजाअर्चा करणारा इथला पुजारीही सिक्स पॅक अॅबवाला आहे. 

Sep 3, 2014, 10:17 PM IST
पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!

पुण्यातल्या गणेशोत्सवाचं रूप पालटलं!

तब्बल सव्वाशे वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कमालीचा बदललाय. हा निश्चितच बदलत्या काळाचा परिणाम आहे, असं असलं तरी गणपतीच्या सणाला आलेलं निव्वळ इव्हेंटचं स्वरूप काहीसं निराशाजनकच म्हणावं लागेल. पुण्यातील गणेशोत्सवाचं स्वरुपही खूप बदललंय.  

Sep 3, 2014, 10:05 PM IST
गणेशोत्सवात कोकणात रंगतो बाल्या डान्स!

गणेशोत्सवात कोकणात रंगतो बाल्या डान्स!

गणेशोत्सव म्हटलं की समोर येतो तो बाल्या डान्स... कोकणात याला जाखडी नृत्य असंही म्हटलं जातं... कोकणची ओळख असलेलं हे जाखडी नृत्य विशेषता: रत्नागिरी जिल्ह्यात पहायला मिळतं... गणेशोत्सवात कोकणातल्या वाड्या वस्त्यांवर जाखडीच्या डबलबारीचे कार्यक्रम रंगतात... 

Sep 1, 2014, 10:13 PM IST
बाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा!

बाप्पासाठी पुण्यात रंगली मोदक स्पर्धा!

बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. त्यामुळं गणेशोत्सवात मोदकांचं महत्त्व औरच असतं. पुण्यात प्रबोधन संस्थेनं आयोजित केलेल्या मोदक स्पर्धेत तब्बल 2 हजार 200 महिला सहभागी झाल्या होत्या. साहजिकच वेगवेगळ्या प्रकारचे मोदक या ठिकाणी पाहायला मिळाले. 

Aug 31, 2014, 08:40 PM IST
सांगलीचा ‘चोर गणपती’

सांगलीचा ‘चोर गणपती’

सांगलीत चोर गणपतीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

Aug 30, 2014, 10:26 PM IST
पाकिस्तानच्या कराचीतही गणेशोत्सवाची धूम!

पाकिस्तानच्या कराचीतही गणेशोत्सवाची धूम!

भारतात गणेशोत्सवाची धूम आहे ती तर आपण जाणतोच. पण भारताचा शेजारी देश पाकिस्तानातही गणेशोत्सव साजरा केला जातोय. कराचीमध्ये जागोजागी गणपतीची स्थापना केली जाते. 

Aug 30, 2014, 09:59 AM IST
मुख्यमंत्र्यांसहीत अनेक नेत्यांचं बाप्पाकडे साकडं!

मुख्यमंत्र्यांसहीत अनेक नेत्यांचं बाप्पाकडे साकडं!

सर्वसामान्य आणि सेलिब्रेटींप्रमाणे नेतेमंडळीही गणेशचरणी लीन झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्यासह वर्षावर गणपतीची प्रतिष्ठापना केली. 

Aug 29, 2014, 10:25 PM IST
पुण्यातले मानाचे गणपती विराजमान!

पुण्यातले मानाचे गणपती विराजमान!

ढोल ताशाचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया चा जयघोष अशा उत्साही वातावरणात पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं आगमन झालं… आता पुढचे दहा दिवस पुणं गणपतीमय झालं असणार आहे. 

Aug 29, 2014, 09:35 PM IST
सण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या

सण-वाराच्या दिवसांत सोन्याच्या किंमती वधारल्या

परदेशी बाजारात सोन्याचे भाव सध्या मंदावलेत. पण, भारतात मात्र सण-वारांचे दिवस आल्यानं सोन्याची किंमत 70 रुपयांनी वधारलेत. 

Aug 29, 2014, 05:31 PM IST
गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य

आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, गणपतीला दाखवायचा असा नैवेद्य. ज्यानं तुमचा गणपतीबाप्पा एकदम खूष होऊन जाईल. अतिशय क्रिएटीव्ह आणि इनोव्हेटिव्ह मोदकांची व्हरायटी खास तुमच्यासाठी.

Aug 29, 2014, 12:22 PM IST
गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणपती उत्सव : राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त

 गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईत महिला छेडछाड विरोधी पथकासह ४४ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. लालबाग राजा कार्यकर्त्यांना नीट वागण्याची पोलीस आयुक्तांची तंबी दिली आहे.

Aug 29, 2014, 08:54 AM IST
गणपतीची आज प्रतिष्ठापना,  दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

गणपतीची आज प्रतिष्ठापना, दुपारपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

 घरगुती आणि सार्वजनिक गणपतीची आज प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. दीड दिवसांपासून 10 दिवसांसाठी हवाहवासा पाहुण्याचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. आज दुपारी 1.40 पर्यंत प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे. तर गणेशोत्सवासाठी राज्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Aug 29, 2014, 08:39 AM IST
 लालबाग मंडळाला राकेश मारियांचा इशारा

लालबाग मंडळाला राकेश मारियांचा इशारा

मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला कडक असा इशारा दिलाय. लालबागचा राजा मित्र मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही भाविकांशी किंवा पोलीसांशी गैरवर्तणूक केली तर, त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी लालबागचा राजा गणपती मंडळाला दिला आहे. 

Aug 28, 2014, 04:36 PM IST
सार्वजनिक गणेशोत्सवाची एकच धूम

सार्वजनिक गणेशोत्सवाची एकच धूम

गणरायाचं आगमन अवघ्या एक दिवसावर य़ेऊन ठेपलंय. घरोघरात आणि प्रत्येक सार्वजनिक चौक-गल्ली-चाळी-सोसायट्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची उद्यापासून एकच धूम उडणार आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सगळीकडे सुरू आहे. 

Aug 28, 2014, 08:13 AM IST
प्लास्टर ऑफ पॅरिस  गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत  चिमुरड्याकडून जागृती

प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्ती : प्रदूषणाबाबत चिमुरड्याकडून जागृती

प्लास्टर ऑफ पँरिसच्या गणेशमूर्तीपासून दरवर्षी मोठं प्रदूषण होतय. त्याला आळा बसावा यासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढतोय. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे. औरंगाबादचा एक चिमुरडा गेल्या काही वर्षांपासून ही जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.

Aug 28, 2014, 07:52 AM IST
पुण्यात गणेशोत्सवात 'टोल' विघ्न बंद

पुण्यात गणेशोत्सवात 'टोल' विघ्न बंद

पुण्याच्या गणेशोत्सवात यंदा लेझिमबरोबर वाजणा-या टोलचा आवाज ऐकू येणार नाही. कारण यावर बंदी घालण्यात आली आहे.

Aug 27, 2014, 12:44 PM IST
बाप्पा गणेशमंडळांना पावलाय, खड्डयांबाबत मुंबई पालिका गप्प

बाप्पा गणेशमंडळांना पावलाय, खड्डयांबाबत मुंबई पालिका गप्प

गणपती मंडळांना महापालिकेनं खड्ड्यांसाठीची दंडवसुली माफ केलीय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि राजकीय पक्षही गप्प आहेत. त्यामुळे गणपती आले् काय आणि गेले काय. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खड्ड्यांचं विघ्न कायम राहणार आहे.  

Aug 27, 2014, 12:15 PM IST