वेळीच उपचार केले तर जीव वाचेल, liver damage होतंय याचा इशारा देतात ही ९ लक्षणं

यकृत (Liver) शरीरात महत्वाची भूमिका बजावत असतो. 

Updated: Jun 15, 2021, 08:35 PM IST
वेळीच उपचार केले तर जीव वाचेल, liver damage होतंय याचा इशारा देतात ही ९ लक्षणं

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वच वेगवान झालंय. बदलत्या लाईफस्टाईलमुळे खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळे विविध समस्या उद्भवतात. यकृत मानवी शरीरातील सर्वात दुसरा मोठा अवयव आहे. यकृत (Liver) शरीरात महत्वाची भूमिका बजावत असतो. अन्नपदार्थाचं रुपांतर उर्जेत करणं हे यकृताचं प्रमुख कार्य असतं. दरम्यान यकृताची योग्य काळजी न घेतल्यास (Liver damage) व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. यकृताला बाधा पोहचत असल्यास 9 लक्षण दिसून येतात. (9 symptoms that indicate liver damage know how to save life by timely treatment)

मद्यपानामुळे यकृताला पोहचते बाधा

यकृताच्या समस्यांवर योग्य वेळेस उपचार केल्यास आजार बरा होता. पण ठराविक टप्प्यानंतर यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) हा शेवटचा पर्याय असतो. 

साधारणपणे  यकृताचा मोठा भाग खराब झाल्यास यकृत खराब झाल्याचं महणता येतं. यावर जवळपास उपचार अशक्य असतात. लिव्हर खराब होण्यामागे अनेक कारणं आहेत. यामध्ये वायरल हेपटायटिस, सिरोयसिस, मद्यपान, तळलेले आणि मसालेदार पदार्थ यांचा समावेश आहे. 

लिव्हर खराब होण्याची ९ लक्षणं 

लिव्हर खराब होण्याचे अनेक लक्षणं आहेत. विशेष म्हणजे लिव्हर खराब होण्याची बहुतांश लक्षणं ही सर्वसाधारण आहेत. हे संकेत डॉक्टरांच्या उपचारांशिवाय मिळतात. काही वेळा तर ही लक्षणं समजून येत नाहीत. याचं निदान फार उशीरा होतं. परिणामी तो पर्यंत फार उशीर झालेला असतो. 

जाणून घ्या लक्षणं

myupchar.com नुसार, उलटी, कमी भूक, थकावट, वजनात घट, शरीरात खाज हे आणि यासारखे ही  यकृत खराब होण्याची प्राथमिक लक्षणं आहेत. तज्ज्ञांनुसार निरोगी यकृतासाठी मद्यपान टाळावे. तसेच तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळा. 

संबंधित बातम्या : 

कच्च्या तांदळाचं सेवनाने या गंभीर समस्यांना मिळतंय आमंत्रण

Coronavirus Guidelines: लहान मुलांच्या सुरक्षेसाठी आयुष मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर