...जेव्हा रुग्णाच्या पोटातून निघाला स्टिलचा ग्लास!
मध्यप्रदेशच्या सतनामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ५५ वर्षीय रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढला... आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
सतना : मध्यप्रदेशच्या सतनामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका ५५ वर्षीय रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क स्टीलचा ग्लास बाहेर काढला... आणि सगळ्यांनाच धक्का बसला.
सतनास्थित सार्थक हॉस्पिटलमध्ये एक गृहस्थ पोटदुखी आणि डायरियाची तक्रार घेऊन दाखल झाला होता. यानंतर डॉक्टरांनी एक्स-रे काढून पाहिल्यानंतर रुग्णाच्या पोटात चक्क धातूचा ग्लास असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
रुग्णाच्या पोटात स्टीलचा ग्लास होता... हा ग्लास रुग्णाच्या पोटात कसा पोहचला? हे मात्र समजू शकलेलं नाही.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून ग्लास बाहेर काढला... रुग्णाची तब्येत सुधारत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय.