Anil Kapoor Health : अनिल कपूर 'या' आजाराने त्रस्त, जाणून घ्या लक्षणे

अनिल कपूर यांच्या आजाराची लक्षणे, गेल्या 10 वर्षांपासून झुंज सुरू 

Updated: Nov 27, 2021, 12:54 PM IST
Anil Kapoor Health : अनिल कपूर 'या' आजाराने त्रस्त, जाणून घ्या लक्षणे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर फिटनेसकरता देखील अतिशय लोकप्रिय आहेत. वयाच्या 64 व्या वर्षी अनिल कपूर यांचा फिटनेस सगळ्यांना लाजवणारा आहे. पण नुकतीच एक बातमी समोर आली. अनिल कपूर गेली 10 वर्षे एका आजाराशी झुंजत आहे. जर्मनीमध्ये अनिल कपूर या आजारावर उपचार घेत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांपासून अनिल कपूर अकिलिस टेंडन इंज्युरी (Achilles Tendon Problems) या आजाराने त्रस्त आहेत. अनिल कपूर यांनी या आजाराबाबत खुलासा केला आहे. 

आजाराची लक्षणे 

हा रोग एखाद्या व्यक्तीच्या पायांच्या खालच्या भागाला दुखापत करतो. त्यामुळे चालायला त्रास होतो आणि खूप वेदना होतात. या समस्येमुळे शस्त्रक्रिया देखील होते. जगभरातील डॉक्टरांनी अनिल कपूर यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता, मात्र डॉ.मुलर यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते.

गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी स्वतः खुलासा केला होता. एका दशकाहून अधिक काळ ऍचिलीस टेंडिनाइटिसने (Achilles Tendinitis ) त्रस्त आहेत. जे आता जर्मनीतील डॉ. मुलर यांच्याकडून उपचार करून घेत आहेत.  त्यानंतर अनिल कपूर यांनी एक पोस्ट लिहिली होती. आणि सांगितले होते की, तो कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय बरा झाला आहे आणि धावू लागला आहे आणि आता तो सोडून देत आहे. 

10 वर्षांपासून अकिलीस टेंडिनाइटिसने ग्रस्त आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अनिलने लिहिले होते की डॉ. हॅन्स-विल्हेम मुलर-वोल्फाहर्ट यांच्या मदतीने कोणतीही शस्त्रक्रिया न करता तो या स्थितीतून बरा झाला. 

अनिल कपूर यांनी लिहिले होती की, “मी 10 वर्षांहून अधिक काळ ऍचिलीस टेंडनच्या समस्येने त्रस्त होतो. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितले होते की शस्त्रक्रिया हाच माझा एकमेव पर्याय आहे. डॉ. म्युलर, टवटवीत उपचारांच्या मालिकेद्वारे, मला लंगडत चालण्यापासून ते शेवटी धावण्यापर्यंत नेले. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय."

२०१९ मध्ये अनिल उजव्या खांद्याच्या दुखण्याने हैराण झाले होते. तेव्हाही त्यांनी जर्मनीत डॉ. हॅन्स मुल्लर यांच्या कडेच उपचार घेतले होते. मुल्लर सेलेब्रिटी स्पोर्ट्स डॉक्टर असून ते सध्या जर्मनीच्या फुटबॉल टीम बरोबर काम करत आहेत. त्यांच्या क्लायंटमध्ये धावपटू उसेन बोल्ट, टेनिस खेळाडू बोरिस बेकर यांची नावे आहेत.