मुंबई : सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे अनेक आजार पसरले आहेत. त्यात मुख्य म्हणजे खोकल्यामुळे बहुतांश लोक त्रासलेले आहेत. खोकल्यामुळे सर्दी, ताप, डोके दुखी, घश्यात खवखव अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत रूग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर मेडीकलमधून औषधे विकत घेतात. हे तुमच्या आरोग्यावर बेतू शकतं. तर काही अशी औषधे असतात त्यामध्ये आयुर्वेदिक गुण असतात. अननस आणि मध हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी औषध आहे. अननस आणि मधाच्या नियमित सेवनामुळे खोकला कमी होण्याची शक्यता असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोकल्याचे औषध बणवण्यासाठी लागणारी सामग्री
- चिरलेले अननस
- एक टी स्पून मध 
- एक छोटा आल्याचा तुकडा
- एक टी स्पून लिंबाचे रस
- चिमूटभर तिखट-गोड 
- मिठ चवीनुसार


कृती
वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करा. औषध जास्त घट्ट झाले असेल तर त्यात थोडे पाणी घाला. त्यानंतर एका बाटलीमध्ये बंद करून ठेवा. एका आठवड्यापर्यंत औषध नियमित घेतल्यास लवकर फरक जाणवेल.


अननस आणि मध का आहे उपायकारक
फणसात विटॉमिन ए, सी, थाइमिन, पोटॉशियम, कॅल्‍शियम, आयरन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम असते. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते. फणस हे जगातील सर्वात मोठे फळ आहे. डॉक्टर देखील हे खाण्याचा सल्ला देतात. 


मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित फणसाच्या पानांच्या रसाचे सेवन करणे फायद्याचे असते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे. फणसामध्ये रोगप्रतिकारक क्षमता असते. त्याचप्रमाणे मधामध्ये अँटी-फंगल, जीवाणू, यांसारखे घटक असतात. त्यामुळे मुरुम किंवा अ‍ॅक्ने, पिंपल्स कमी करण्यास मध मदत करतो. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्यांनी फणस कमी खाल्लेलं बरं, फणस हे उष्ण फळ आहे