Gangrene Symptoms in Marathi: डायबेटीक फुट गँगरीन ही मधुमेहाची जीवघेणी गुंतागुंत आहे. जेव्हा पायात रक्त प्रवाह कमी होतो तेव्हा ते उद्भवते, ज्यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि संसर्गामुळे ऊती मृत पावतात. अनियंत्रित रक्तातील साखर, मज्जातंतूंचे नुकसान (न्यूरोपॅथी) आणि रक्ताभिसरण प्रक्रियेतील अडथळे असलेल्या व्यक्तींना याचा जास्त धोका असतो. वेळीच उपचार न केल्यास, गँगरीन पसरू शकतो, कधीकधी गँगरीन झालेला अवयव कापून टाकण्याचीही वेळ येते.
डायबेटीक फुट गँगरीनचे कारण हे नसांच्या नुकसानासह रक्ताभिसरण प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांमुळेही उद्भवते. जेव्हा नसा खराब होतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या पायांना वेदना किंवा दुखापत जाणवत नाही, ज्यामुळे लहान जखमांवर उपचार केले जात नाहीत. संसर्ग होऊ शकतो आणि रक्ताभिसरण खराब झाल्यास, शरीर त्यांच्याशी लढण्यासाठी संघर्ष करते, ज्यामुळे ऊतींचा मृत्यू (गॅंगरीन) होतो. बोटं किंवा हातपाय गळणे तसेच संसर्ग रक्तप्रवाहात पसरल्यास सेप्सिस सारखी गुंतागुंत होऊ शकते. याबाब दिलेली माहिती डॉ. अशांक बन्सल - व्हॅस्क्युलर सर्जन आणि इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टयांनी दिली आहे.
पायांची बोटं काळी पडणे: गॅंगरीनच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे पायांची बोटं काळी पडणे. रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे ऊती मृत पावल्याने ही समस्या उद्भवते. म्हणूनच याबाबतीत त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पाय सुन्न होणे: संवेदना कमी होणे हे देखील एक सांकेतिक लक्षणे समजले जाते. याचाच अर्थ मज्जातंतूंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पायाला झालेल्या जखमांकडे दुर्लक्ष करु नका.
पायांचे अल्सर किंवा उघड्या जखमा ज्या बऱ्या होत नाहीत.
पायात सूज, लालसरपणा किंवा उष्णता जखमेतून येणारा दुर्गंधी तसेच पायांमध्ये अचानक किंवा वाढणारी वेदना, संक्रमण पसरल्यास ताप किंवा थंडी वाजणे . या वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे
संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर करणे
जखम स्वच्छ करणे आणि मलमपट्टी करणे
मृत ऊती काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा गंभीर प्रकरणांमध्ये, संसर्ग झालेला अवयव कापावा लागणे
औषधे किंवा रक्तवहिन्यासंबंधी प्रक्रियांद्वारे रक्त परिसंचरण सुधारणे
प्रतिबंधात्मक उपाय: पायांमध्ये झालेली जखम, फोड किंवा पायांचा रंग बदल तपासणे, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे, आरामदायी तसेच चांगली फिटिंग असलेले शूज वापरणे, अनवाणी चालणे टाळा आणि त्वचेत काही असामान्य बदल दिसल्यास त्वरीत तज्ञांचा सल्ला घ्या.
पायांची चांगली काळजी घेतल्यास डायबेटीक फुट गॅंगरीन टाळता येते. बोटं काळी पडणे आणि पाय सुन्न पडणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. तुमचे पाय आणि तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेळीच वैद्यकीय मदत घ्या.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(20.4 ov) 69/5 (70.3 ov) 225
|
VS |
WI
143(52.1 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.