लिव्हर सिरोसिस : कॅन्सरनंतर अत्यंत गंभीर असणार्या `या` आजाराची लक्षणं कशी ओळखाल?
यकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.
मुंबई : यकृत हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. यकृतामुळे शरीराचे पचन सुरळीत राहण्यास मदत होते. सोबतच शरीरात पित्ताचं प्रमाण संतुलित ठेवणं, रक्त स्वच्छ ठेवणं, शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. पण आपल्या नियमित जीवनातील काही वाईट सवयींमुळे यकृताचे कार्य बिघडते. परिणामी आरोग्यावर काय परिणाम होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
यकृताच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर संबंधित टिश्यू खराब होतात. हळूहळू यकृताशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हर कॅन्सर, लिव्हर अॅबसेस,फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिसचा त्रास जडू शकतो. आजकाल लिव्हर सिसोरिसचं वाढत आहे.
लिव्हर सिरोसिस म्हणजे काय ?
कॅन्सरनंतर सगळ्यात गंभीर आजार म्हणजे लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरॉसिसच्या शेवटच्या टप्प्यात त्यामधून बचावण्याचा एक मार्ग म्हणजे यकृताचं प्रत्यारोपण. जेव्हा यकृताचे टिश्युज नष्ट होतात तेव्हा ही समस्या जडायला सुरूवात होते. यामध्ये लिव्हरचा आकार असामान्य होण्यास सुरूवात होते. अशा परिस्थितीमध्ये पोर्टल हायपरटेंशन वाढण्यास सुरूवात होते.
लिव्हर सिरोसिसचे तीन टप्पे
लिव्हर सिरोसिसचा आजार हा तीन टप्प्यांमध्ये वाढतो. प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी लक्षण आढळतात.
पहिला टप्पा
लिव्हर सिरॉसीसमध्ये पहिल्या टप्प्यात वजन कमी होणं, थकवा जाणवनं, पचन बिघडणं अशा समस्या जाणवतात.
दुसरा टप्पा
उलटी होणं, भूक मंदावणं, ताप येणं, चक्कर येणं
अंतिम आणि तिसरा टप्पा
अंतिम टप्प्यात अनेकदा रक्ताची उलटी होणं, लहानशा जखमेतूनही भळाभळा रक्तप्रवाह होणं, शुद्ध हरपणं अशी लक्षणं दिसतात. लिव्हर सिरोसिसच्या या टप्प्यात यकृत प्रत्यारोपणाशिवाय इतर पर्याय नाही.
लिव्हर सिरोसिसची कारणं आणि लक्षण
रक्तामध्ये आर्यनची मात्रा वाढल्याने,
मादक स्टीटोहेपेटाइटिस
लठ्ठपणा
मधूमेह
पोटात वेदना, सूज वाढणं
मूत्राचा रंग अधिक गडद होणं
गंभीर स्वरूपाची काविळ
कसा टाळाल धोका?
लिव्हर सोरासिसचा धोका टाळायचा असेल तर खाण्या-पिण्यासोबतच तुमच्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करा.
दारू किंवा सिगारेटचं व्यसन असल्यास त्याचा मोह टाळा
आहारात गाजर, फळं, शिंगाडा, अंड, दूध, सोयाबिनचा समावेश करा. संतुलित आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास यकृताचं आरोग्य जपण्यास मदत होते.