Cholesterol खरोखरच शरीरासाठी घातक? पाहा काय आहे नेमकं सत्य!
पचनासाठी आवश्यक रसायने बनवण्यातही कोलेस्ट्रॉलची भूमिका असते.
मुंबई : निसर्गाने प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट कारणासाठी निर्माण केलीये. पण काही गोष्टी अशा असतात ज्यांना लोक वाईट समजतात. यापैकी एक म्हणजे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलबाबत लोकांच्या मनात फक्त गैरसमज आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जर कोलेस्ट्रॉल शरीरात राहिलं नाही तर आपण जास्त काळ जगू शकत नाही.
कोलेस्ट्रॉल शरीरात टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन हार्मोनसह अनेक हार्मोन्स बनवतं. याशिवाय चयापचय वाढवण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज भासते. पचनासाठी आवश्यक रसायने बनवण्यातही कोलेस्ट्रॉलची भूमिका असते. यकृत आणि आतड्यात अशी अनेक कार्ये आहेत जी कोलेस्टेरॉलशिवाय शक्य नाहीत. त्यामुळे केवळ कोलेस्ट्रॉलला पूर्णपणे खराब मानणं योग्य नाही.
कोलेस्ट्रॉल काय आहे
हेल्थलाइनच्या माहितीनुसार, कोलेस्ट्रॉल हे लिपिड किंवा चरबीचा एक प्रकार आहे जे रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पोहोचतं. त्याला लिपोप्रोटीन म्हणतात. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहेत - लो डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा (एलडीएल) आणि हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा (एचडीएल) एलडीएल हे वाईट कोलेस्टेरॉल मानलं जातं. कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाल्याने ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हाई डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजेच एचडीएल हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. कोलेस्ट्रॉल शरीरात दोन प्रकारे तयार होतं. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा त्यांच्यापासून कोलेस्ट्रॉल तयार होते. दुसरं यकृत देखील ते स्वतः बनवतं.
कोलेस्ट्रॉलचे कार्य
कोलेस्टेरॉल अनेक हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये मोठी भूमिका बजावतं. व्हिटॅमिन डी शरीरात फक्त कोलेस्ट्रॉलमुळे शोषलं जातं. पचनाशी संबंधित अनेक ऍसिडस् तयार करण्यात कोलेस्ट्रॉल महत्त्वाची भूमिका बजावतं. कोलेस्ट्रॉलमुळे, चरबी शरीरात शोषली जाते, ज्यामुळे अनेक कार्ये सुरळीतपणे करता येतात. कोलेस्ट्रॉल पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन्स प्रजननासाठी आवश्यक असतं.