कोरोनाची साथ अजूनही तीव्रच; सीएसआयआरचा इशारा

कोरोनाची साथ अजून तीव्रच असल्याचा इशारा सीएसआयआरकडून देण्यात आला आहे.

Updated: Aug 28, 2021, 08:44 AM IST
कोरोनाची साथ अजूनही तीव्रच; सीएसआयआरचा इशारा title=

मुंबई : देशावरून कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून त्याचा फटका मात्र अनेकांना बसलाय. असातच देशात कोरोनाची साथ अजून तीव्र असल्याचा इशारा सीएसआयआरकडून देण्यात आला आहे. 

सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचं स्वरूप अजूनही साथरोग म्हणजेच पॅन्डेमिक हेच असून त्याचं सौम्य किंवा मध्यम स्वरूपाच्या साथीमध्ये म्हणजेच एन्डेमिकमध्ये रूपांतर झालेलं नाही. दरम्यान कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तीव्र नसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिका सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोना एन्डेमिक स्थिती गेल्याचं मत मांडलं होतं. मात्र आता आयसीएमआरने हा दावा फेटाळला. तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेइतकी तीव्र आणि नुकसानदायी नसेल, असं मांडे यांनी मत व्यक्त केलं.

दरम्यान या काळात तज्ज्ञांनी नवीन सुपर स्ट्रेनच्या धोक्याची भीती व्यक्त आहे. इम्युनॉलॉजिस्टांना भीती वाटते की कोविड -22 सुपर स्ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक असू शकतो. शिवाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या काळात याची काही प्रकरणं समोर येऊ शकतात.

डेल्टापेक्षाही हा धोकादायक

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोविड-22 स्ट्रेन हा डेल्टा वेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक बनू शकतो. आतापर्यंत, कोरोनाचा डेल्टा प्रकार सर्वात धोकादायक आणि संसर्गजन्य मानला जातो. परंतु तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, 'कोविड -22' नावाचे नवीन रूप सध्याच्या सर्वात घातक डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असू शकतं