जेवणानंतर बडीशेप खाण्यास सगळेत पसंती देतात. कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखी शरीराला आवश्यक असणारे  पोषक घटक बडीशेपमध्ये आढळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपचनाचा त्रास होत नाही
पोटाच्या तक्रारी वारंवार जाणवत असतील तर बडीशेप सेवन करणं फायदेशीर ठरतं. बडीशेपमुळे अ‍ॅसिडीटी आणि अपचनाचा त्रास होत नाही. बडीशेपचा गुणधर्म हा थंड असल्याने उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेप खाणं आरोग्यदायी ठरतं. उन्हाळ्यात दुपारी ताक पिणं फायदेशीर आहे. ताकामध्ये बडीशेपची पूड टाकून पिल्याने छातीत जळजळणं कमी होतं. 


रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत 
बडीशेपमध्ये पोटॅशियमची मात्रा मुबलक असते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. हृदयाची आरोग्य निरोगी राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रित असणं महत्त्वाचं आहे. रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी बडीशेपचं सेवन करणं आरोग्यदायी मानलं जातं. 


 
श्वसनाचे आजार कमी होतात 
दमा, अस्थमा यासरख्या आजारावर बडीशेप गुणकारी मानली जाते. बडीशेपमध्ये फायटोन्यूट्रिएंट्स घटक असतो त्यामुळे जर तुम्हाला सायनसचा त्रास होत असेल तर बडीशेपचं सेवन करणं रामबाण उपाय आहे. 


त्वचेच्या आरोग्यावर फायदेशीर 
पोटॅशियम, सेलेनियम आणि जस्त यांसारख्या घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रात्रभर भिजवलेल्या बडीशेपच्या पाण्याने चोहऱ्यावर मासाज केल्याने मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. बडीशेपचं सेवन केल्याने  रक्तातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. तसंच हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी बडीशेपचं सेवन गुणकरी मानलं जातं. मुरुम, पुरळ आणि कोरडेपणा यासारख्या त्वचेच्या विविध समस्यांवर आहारात बडीशेपचं सेवन करणं  रामबाण उपाय मानला जातो. 


डोळ्यांचे आरोग्य सुधारते 
 मोबाईल किेवा कम्पुटरच्या स्क्रीनमुळे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसंच बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये  अनियमीत मासिकपाळी आणि अतिरिक्त रक्तस्राव यामुळे व्हीटामीन 'ए' कमरता निर्माण होऊन कमी वयात चष्मा लागणं किंवा वारंवार डोळ्यांचे आजार होत असतात. बडीशेपमच्या सेवनाने व्हिटामीन  'ए' ची कमतरता दूर होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात बडीशेपचा समावेश नक्की करणं फायदेशीर ठरतं. 


वजन कमी करण्यास फायदेशीर 
वजन कमी करण्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरतं. सकाळी उपाशी पोटी बडीशेपची पूड कोमट पाण्यातून घेतल्याने जास्त वेळ पोट भरलेलं  राहतं. बडीशेप थंड असण्याबरोबरच त्यातील  फायबरमुळे सतत भूक लागत नाही.त्यामुळे वजन कमी करण्यास बडीशेप फायदेशीर ठरतं. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)