मुंबई : केवळ वातावरणातील उष्णता हे घाम येण्याचं कारण नाही. अनेक  लोकांना ताण, शारीरिक कसरत, आहरातील काही पदार्थ, हार्मोनल बदल यामुळेही घाम येतो. घाम येण्याच्या समस्येला आटोक्यात ठेवायचं असेल तर आहारातही काही बदल करणं आवश्यक आहे. 


घामामुळे दुर्गंध येत असल्यास काय टाळाल ? 


दूध - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दूध हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दूधातील कोलिन घटकामुळे घामामुळे अंगाला वास येतो. हा त्रास तुम्हांलाही असल्यास उन्हाळ्याच्या दिवसात दूध कमी प्रमाणात प्यावे. त्याऐवजी दह्याचा आहारात समावेश करा. 


कांदा,लसूण - 


उन्हाळ्याच्या दिवसात लसूण कमी प्रमाणात खावे.यामुळे अंगाला वास येतो. त्याऐवजी दालचिनी, वेलची यांचा आहारातील समावेश वाढवा. 


अल्कोहल - 


शरीराला घामाचा वास येत असल्यास दारूचे सेवन टाळा. त्याऐवजी लिंबूपाणी प्यावे.  


कॉफी - 


कॉफीचे सेवनही टाळा. यामुळे घामाच्या वासाने शरीराला दुर्गंध येण्याचं प्रमाण वाढतं. कॉफीऐवजी ग्रीन टी प्यावी.