चुकूनंही फ्रिजमध्ये अंडी ठेवू नका; कारण...
अंड उकडण्यापूर्वी त्याला फ्रिजमध्ये ठेवायचं नाही. मात्र यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का?
मुंबई : तुम्ही अनेकदा ही गोष्ट ऐकली असेल की अंड उकडण्यापूर्वी त्याला फ्रिजमध्ये ठेवायचं नाही. मात्र यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? फार कमी लोकांना यामागील कारण माहिती असेल.
डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील मुख्य शेफ जेम्स मार्टिन यांनी अंड्यांबाबत माहिती देण्यात आलेली आहे. यासाठी त्यांनी दोन अंडी घेतली. यातील एक अंडं बदकाचं आणि दुसरं कोंबडीचं होतं. शेफने बदकाचं अंडी फ्रीजमध्ये न ठेवता थेट उकडण्यास सुरुवात केली. त्याच वेळी, कोंबडीची अंडी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर उकडलं.
दोन्ही अंडी नीट उकडल्यानंतर जेम्सने त्यांना दोन्ही अंडी कापून पाहिली. यादरम्यान त्यांनी फ्रीजमध्ये न ठेवलेलं बदकाची अंडं योग्य पद्धतीने उकडलं असल्याचं त्यांना समजलं. त्याचवेळी फ्रीजमध्ये ठेवलेलं कोंबडीची अंडी उकडल्यानंतर योग्य पद्धतीने शिजलेलं नसल्याचं दिसून आलं.
इतकंच नाही तर दोन्ही अंड्याच्या चवीतही देखील बराच फरक दिसून आला. याविषयी बोलताना जेम्स म्हणाले की, अंडं फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील वास आणि चव अंडी आपल्या आत शोषून घेतात. यामुळेच फ्रीजमध्ये ठेवलेल्या अंड्याची नैसर्गिक चव राहत नाही.
तसेच अंडं फ्रीजमध्ये ठेवल्याने अंड्याच्या कवचावर असलेले बॅक्टेरिया अधिक एक्टिव्ह होतात. अशा परिस्थितीत ते अंड खाणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्ही चवीनुसार तसंच उत्तम आरोग्यासाठी अंड्याचं सेवन करत असाल तर लक्षात ठेवा की, फ्रीजमध्ये जास्त थंडीमुळे अंड्यातील पोषक तत्व नष्ट होतात. त्यामुळं असं करणं टाळा आणि अंडी कोरड्या ठिकाणी ठेवा.