तुम्हाला दररोज मध्यरात्री 2-3 च्या दरम्यान झोपेतून जाग येते का? आत्ताच डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Reasons Why you Wake Up from Sleep at 3am Every Night: तुम्हालादेखील मध्यरात्री दररोज एका ठराविक वेळेला जाग येते का? तर आत्ताच काळजी घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 18, 2025, 09:34 AM IST
तुम्हाला दररोज मध्यरात्री 2-3 च्या दरम्यान झोपेतून जाग येते का? आत्ताच डॉक्टरांचा सल्ला घ्या!
Do You Wake Up Between 2 3 Am Every Night know the reasons

Reasons Why you Wake Up from Sleep at 3am Every Night: मध्यरात्री झोपेतून जाग येणे ही सामान्य बाब आहे. कधी तहान लागल्यावर किंवा कधी लघवीला जाण्यासाठी झोपेतून जाग येते. मात्र मध्यरात्री एका ठराविक वेळेला म्हणजेच मध्यरात्री 2-3 च्या दरम्यान रोज जाग येत असेल. तर मात्र हे काळजीचे कारण ठरू शकते. डॉ. एरिक बर्ग हे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ आहेत. त्यांनी युट्यूबला शेअर केलेल्या एका व्हिडिओत मध्यरात्री सतत एकाच टायमिंगला झोपमोड होण्याची कारण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. बर्ग यांच्या युट्यूब चॅनेलचे 13 मिलियन सबस्क्रायबर आहेत. 

डॉ. बर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, तणावामुळं कार्टिसोलचे प्रमाण सामान्यतः पहाटे 2च्या सुमारास सर्वात कमी पातळीवर असते. पण जर कार्टिसोल वाढले तर त्यामुळं झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि त्यामुळं रात्री जाग येऊ शकतो. रात्रभर झोप झाली नाही तर त्यामुळं संपूर्ण दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो.

मध्यरात्री जाग येणे हे नैराश्याचे एक लक्षण असू शकते. डिप्रेशन शरीराची दिनचर्या बिघडू शकते. यामुळं कार्टिसोल नावाचे तणाव निर्मा करणारे हार्मोन्स वाढते. यामुळंच व्यक्तीला रात्री गाढ झोप लागत नाही. डिप्रेशनबरोबरच क्रोनिक तणावदेखील झोपेमुळं अडथळा निर्माण होऊ शकतो. जर एखादा व्यक्ती तणावात असेल तर त्याला दररोज 2-3 च्या सुमारास जाग येणारच. त्याकाळात त्यांचा मेंदूदेखील अधिक वेगाने काम करतो. त्यामुळं त्याला शांत झोप येत नाही. शरीरातील अलर्टनेस आणि अतिप्रमाणात सक्रिय असलेले नर्व्हस सिस्टम यामुळं झोप येत नाही. 

चांगल्या झोपेसाठी या टिप्स फॉलो करा

तुम्हाला शांत व गाढ झोप हवी असेल तर झोपेच्या वेळा ठरवा आणि त्या तंतोतत पाळल्या जातील याची काळजी घ्या. 

झोपेच्या आधी काही काळ ध्यान करणे किंवा स्ट्रेचिंगसारखे व्यायाम करा. यामुळं मनशांत होते. मेंदू व शरीर दोन्ही रिलॅक्स होण्यास मदत होते. 

झोपण्याच्या आधी स्क्रीन टाइम कमी करणे गरजेचे आहे. फोन, टॅबलेट, कंप्युटर यातून येणारा निळा प्रकाश हा मेलाटोनिन नावाच्या ग्रंथीवर बाधा निर्माण करतो. त्यामुळं झोप येत नाही. 

कॅफिन, निकोटीन आणि अल्कोहलच्या सेवनामुळंदेखील झोप येत नाही. 

हे उपाय करुनही तुम्हाला झोप येत नसेल तर लगेचच मनोविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)