Heart Surgery : डॉक्टरांकडून गर्भातील बाळाच्या द्राक्षाइतक्या हृदयावर 90 सेकंदांत यशस्वी शस्त्रक्रिया!
Heart Surgery On Baby Inside Womb : विज्ञानासमोर काहीच अशक्य नाही असं म्हणतात ते अगदी दिल्लीतील डॉक्टरांनी सिद्ध करून दाखवलं. एका महिलेच्या गर्भाशयात द्राक्षाच्या आकाराच्या ह्रदयावर एक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली.
Heart Surgery On Baby Inside Womb : डॉक्टरांना आपण जीवनदाता म्हणतो. डॉक्टरांकडे लोकांच्या आरोग्याच्या संबंधित सर्व समस्यांचे इलाज उपलब्ध असतात. म्हणूनच आपण डॉक्टरांना देवाचा दर्जा देतो. आता अशीच एक घटना समोर आली असून राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील (AIIMS Hospital) डॉक्टरांच्या पथकाने महिलेच्या गर्भाशयात वाढणाऱ्या गर्भाच्या द्राक्षाच्या आकाराच्या ह्रदयावर जटिल शस्त्रक्रिया केला आणि आईच्या पोटातच त्याचा आकार (Heart Surgery On Baby Inside Womb) बदलला. या शस्त्रक्रियानंतर आई आणि तिचे बाळ दोघेही सुरक्षित आहेत. ही शस्त्रक्रिया डिजिटल स्वरुपाची असून या शस्त्रक्रियेला बॅलूक डायलेशन असं म्हटलं जातं.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती महिलेल्या एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत या महिलेचे तीन वेळा गर्भ पडले होते. मात्र ही महिला पुन्हा गरदोर राहिली. परंतु या महिलेच्या गर्भात असलेल्या बाळाच्या ह्रदयाबात दिल्लीतील डॉक्टरांना काही समस्या आढळल्या. त्यांनी ताबडतोब याची माहिती संबंधित महिला आणि तिच्या पतीला दिली. त्यावेळी या महिलेने गर्भ ठेवण्याचा निर्णय घेत डॉक्टरांना पुढील वैद्यकीय प्रक्रिया करण्याची परवानगी दिली.
वाचा: Online Aadhar Card Update करत असाल तर केंद्र सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्या..
एम्समधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांसह इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टच्या (Interventional Cardiologist) टीमने ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली, ज्याला balloon dilation in obstructed heart valves म्हणतात. यामध्ये अल्ट्रासाऊंड मार्गदर्शित प्रक्रियेअंतर्गत, गर्भाची सुई त्याच्या ह्रदयात घातली गेली आणि त्यानंतर फुग्यातील कॅथेटर वापरून ऑब्स्ट्रक्टेड व्हॉल्व्ह उघडण्यात आला. डॉक्टर म्हणाले, संपूर्ण प्रक्रिया खूप लवकरच करायची होती. ते खूप आव्हानात्मक होते. त्यांनी दीड मिनिटांचं शस्त्रक्रिया पूर्ण केली.
एम्समधील डॉक्टरांनी सांगितले की, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या ह्रदयासंबंधित समस्यांची माहिती मिळवली जाऊ शकते. एवढेच नव्हेतर, कधी -कधी गर्भातच बाळावर झालेले उपचार चांगले ठरतात. ज्यामुळे बाळाची सामान्य आणि नैसर्गिकरित्या वाढ होते. आम्ही आईच्या पोटातून सुई मुलाच्या ह्रदयापर्यंत नेली. हि प्रक्रिया अत्यंत किचकट होती. ज्यामध्ये गर्भाच्या जीवालाही धोका असतो, अशी माहिती एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.