मुंबई : तुमचे स्मोकींग सोडण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी 'नाही' म्हणायला शिका. कारण फक्त एकच यापासूनच सुरुवात होते आणि मग त्याचे व्यसनात रूपांतर होते. म्हणून स्मोकींगच्या इच्छेला आळा घालण्यासाठी परिणामकारक अशा काही टीप्स.


स्ट्रॉ चा वापर:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मोकिंगची सवय असणाऱ्या अनेकांना जेवल्यानंतर सिगरेटचा झुरका ओढावा वाटतो. आणि ते सोडण्याचा विचारनेच अनेकांना ताण येतो. पण जेवल्यानंतर स्ट्रॉ चा वापर करा. म्हणजे एखादे पेय पिताना आपण स्ट्रॉ ज्या पद्धतीने वापरतो किंवा ओढतो त्यापद्धतीने ओढा. त्यामुळे स्मोकिंगच्या इच्छेवर मात करण्यास मदत होईल.


रबरबँडचा वापर:


जेव्हा कधी तुम्हाला स्मोकिंगची इच्छा होईल तेव्हा रबर बँड मनगटाभोवती गुंडाळा. त्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वेधलं जाईल.


पदार्थ बनवा:


स्मोकींगचा मोह टाळण्यासाठी स्वयंपाकघरात जा आणि कोणतातरी पदार्थ बनवायला सुरुवात करा. कारण ओल्या हातात तुम्ही सिगरेट धरू शकत नाही. त्यामुळे त्या मोहापासून दूर होण्यास मदत होईल.


विणकाम शिका:


तुम्ही जितके जास्त स्ट्रेस असाल तितका तुम्हाला सिगरेट ओढण्याचा मोह होईल. म्हणून विणकाम शिकून घ्या. त्यामुळे तुमचा ताण कमी होण्यास मदत होईल. परिणामी सिगरेटची आठवण होणार नाही.


व्यायामावर लक्ष केंद्रित करा:


शरीर-मनाचे आरोग्य सुधारण्यासाठी व्यायाम करणे अतिशय उत्तम. हे तुम्हाला माहीतच असेल पण स्मोकिंगची इच्छा होताच व्यायाम केल्यास त्या इच्छेकडे दुर्लक्ष होण्यास मदत होते. ५-१० पुशअप्स किंवा क्रन्चेस यामुळे स्मोकिंगच्या इच्छेला दूर करण्यास मदत होईल.


तुमचा विजय सेलिब्रेट करा:


स्मोकींगच्या इच्छेवर ताबा मिळवल्याचा विजय सेलिब्रेट करा. त्यामुळे तुम्ही अधिक प्रोत्साहीत होता व स्मोकींग सोडण्यास मदत होते.