Explained: तुम्ही सुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर गोष्टी विसरताय, यामागचे वैज्ञानिक रहस्य माहितीये का?

Interesting Fact About Brain: तुम्हालाही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर तिथे कशाला आला आहात हे विसरायला होतं का? यामागचे वैज्ञानिक रहस्य सविस्तर जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.   

मनाली सागवेकर | Updated: Apr 7, 2026, 01:25 PM IST
Explained: तुम्ही सुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर गोष्टी विसरताय, यामागचे वैज्ञानिक रहस्य माहितीये का?
Photo Source: Gimini AI

Know Why The Brain Forgets Things So Quickly: तुमच्या सोबतही असे बऱ्याचदा झाले असलेच, तुम्ही एका ठिकाणी बसलेले असताना अचानक एखादे काम आठवते आणि तुम्ही उठून दुसरीकडे जाता. पण नंतर तिकडे कशासाठी आला होतात हेच लक्षात येत नाही. तसेच एखादी वस्तू आणण्यासाठी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता, पण तिथे गेल्यावर आठवतच नाही कोणती वस्तू घ्यायची होती. अनेकजण याचे कारण मानसिक ताण समजून दुर्लक्ष करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, असे का होते? तुम्हाला वाटत असेल की, हे मेंदूशी संबंधित एका आजाराचे लक्षण आहे. पण खरं तर हे तुमचा मेंदू अगदी योग्यरित्या काम करत आहे याचा संकेत आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. चला तर मग यामागचे रहस्यमयी वैज्ञानिक कारण जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

मानवी मेंदूचे वैज्ञानिक रहस्य

आरोग्य तज्ज्ञांच्या मते या स्थितीला 'डोरवे इफेक्ट' असे म्हटले जाते. मानवी मेंदू माहिती साठवण्यासाठी इव्हेंट मोडेलिंग नावाचे तंत्र वापरतो. जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता, तेव्हा मेंदूला वाटतं की एक अध्याय संपला आणि दुसरा सुरू झाला. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, खोलीचा दरवाजा ओलंडणे म्हणजे मेंदूसाठी एका फाईल मधून दुसऱ्या फाईलमध्ये जाण्यासारखे आहे. 

 

मेंदू ताजी माहिती साठवण्यासाठी सज्ज होतो

हे असे आहे जसे की, तुम्ही मोबाईलचा वापर करत असताना एका अॅपचा वापर करून झाल्यानंतर दुसऱ्या अॅपमध्ये जाता तेव्हा, बॅकएंडला सुरू असलेला आधीचा अनावश्यक अॅप बंद करता. मेंदूही असेच करतो. जेव्हा तुम्ही एका खोलीतून दुसर्‍या खोलीमध्ये जाता तेव्हा मेंदू आधीची माहिती डिलिट किंवा फ्लश करतो. आणि नवीन खोलीत गेल्यानंतर मेंदू तिथल्या वस्तू आणि वातावरणावर लक्ष केंद्रित करू लागतो. ज्यामुळे तुम्ही तिथे कशासाठी आला होतात हे विसरून जाता. 

 

brain1

 

मेंदू एका रॅम क्लीनर सारखे काम करतो

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही एक चांगली स्थिती आहे, कारण हा डोरवे इफेक्ट दर्शवतो की; तुमचा मेंदू नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास अत्यंत वेगवान आहे. जर मेंदू सर्व जुन्या गोष्टी लक्षात ठेवू लागला तर, तो एखाद्या मोबाइलसारखा हँग होऊ शकतो. आणि याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. डोरवे इफेक्टमुळे मानवी मेंदू एक प्रकारे रॅम क्लीनर सारखे काम करते. यामुळे नवीन ठिकाणी किंवा दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर तिथे काही धोका किंवा महत्त्वाची गोष्ट असेल तर, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येते. 

 

एका शिस्तबद्ध मेंदूची लक्षणे काय? 

अश्मयुगातील मानवी मेंदूच्या प्रवृत्तीनुसार, जेव्हा माणून एका गुहेतून बाहेर पडून जंगलात जायचा, तेव्हा त्याला गुहेत काय होते यापेक्षा समोर वाघ किंवा कोणताही धोका आहे का; हे पाहणे जास्त महत्त्वाचे होते. त्यामुळे जागा बदलताच जुनी माहिती विसरली जाते. तज्ज्ञांच्या मते, ज्यांचा मेंदू मिळालेल्या माहितीची लहान तुकड्यांमध्ये वाटणी करून ती लक्षात ठेवू शकतो, तर हे एका शिस्तबद्ध मेंदूचे लक्षण आहे. 

 

विसरभोळेपणाची स्थिती वारंवार जाणवत असेल तर सावध व्हा!

पण हे जर वारंवार होत असेल, म्हणजेच फक्त दुसऱ्या खोलीत गेल्यावरच नाही तर, बोलता बोलता वाक्य विसरत असाल किंवा हातात घेतलेली वस्तू कुठे ठेवायची हेत आठवत नसेल तर हे दुर्लक्षित करण्यासारखे नाही. सतत होणारा विसरभोळेपणा हे अतिताण, अपुरी झोप आणि मानसिक थकवा यांचे लक्षण असू शकते. जेव्हा मेंदूवर माहितीचा खूप भार असतो, तेव्हा ही स्थिती उद्भवते. किंवा शरीरात काही विशिष्ट आवश्यक तत्त्वांची कमी जाणवत असल्यासही स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. 

 

यापासून वाचण्यासाठी काय कराल? 

मेंदूचा विसरभोळेपणा सतत वाढत असेल तर, योग्य वेळी काळजी न घेतल्यास ही स्थिती पुढे गंभीर स्वरूप घेऊन डिमेंशिया किंवा अल्झायमरकडे वळू शकतात. यापासून वाचण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा. 

 

 

  1. दररोज 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या. यामुळे मेंदू ताजी माहिती साठवू शकतो. 
  2. निर्जलीकरणामुळे मेंदू थकतो आणि विसरभोळेपणा वाढतो, त्यामुळे भरपूर पाणी प्या. 
  3. रोज 10 ते 15 मिनिटे ध्यान करा, यामुळे एकाग्रता वाढते. 
  4. आहारात दूध, दही, पनीर अशा दुग्धजन्या पदार्थांचा समावेश करा. यामुळे आवश्यक व्हिटॅमिन बी12 ची कमतरता पूर्ण होईल. 
  5. एकावेळी एकच काम आणि एकाच विचारावर लक्ष केंद्रीत करा. 
  6. नियमित व्यायाम करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारून मेंदूला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होईल. 
  7. मेंदूचा व्यायाम होईल असे खेळ खेळा. 
  8. झोपण्यापूर्वी किमान एक तास स्क्रीन पाहणे टाळा, मोबाईलचा वापर टाळा. 
  9. महत्त्वाच्या कामांची यादी तयार करून ठेवा.
  10. आहारात बदाम आणि अक्रोडचा समावेश करा. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

About the Author

Manali Sagvekar

सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

...Read More