मुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये पेरू खाणं आरोग्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. पेरूमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन असतात, जे शरीराला आरोग्यपू्र्ण राहण्याच मदत करते. पेरू हृदयासंबंधी आजारांवर खूप उपयुक्त ठरतात. पेरू या फळात जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे फळ खाणे त्वचा आणि केस या दोहोंवरही चांगले परिणाम करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉलिक ऍसिड, पोटॅशिअम, तांबे आणि मँगनीज हे धातू पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या अनेक कंपन्या पेरुचा वापर त्यांच्या उत्पादनात करतात. काही लोक पेरू ठेचून त्यात थोडे मध घालून ते मिश्रण चेहऱ्यावर लावतात. त्वचेला यामुळे उजाळा येऊ शकतो. पेरुंमध्ये 'जीवनसत्व के' मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर उमटणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यांवर ते उपाय करता येतात. 



पेरुचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते. पेरू खाल्ल्यानं रक्तामध्ये साखरेचं प्रमाण कमी होतं. सोबतच पेरूचा अर्क रोज सकाळ-संध्याकाळ घेतल्यानं पचनक्रीया व्यवस्थित होते.