Head Neck Cancer symptoms News In Marathi: कॅन्सर हा एक गंभीर आजार असून या आजाराचं नावं घेतलं तरी भीती वाटते. मात्र या कॅन्सरबद्दल आपण पूर्णपणे जागरुक आहोत असं नाही. यामध्ये साधारणपणे लिव्हर कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, लंग्स कॅन्सर, ब्लड कॅन्सर, माऊथ कॅन्सर, स्कीन कॅन्सर याबद्दल सर्वांना माहितचं असेल, पण डोक आणि मान या कॅन्सरबद्दल पुरेशी माहिती नसेल. जाणून घ्या मानेचा किंवा डोक्याचा कॅन्सर नेमका काय असतो? त्यावर कोणते उपचार? 


कॅन्सर झाला म्हणजे नक्की काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या आधुनिक जगात आणि विचित्र जीवनशैलीत अनेक आजार आहेत जे आपल्या अवतीभवती असतात. पण सर्वात गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. जेव्हा तुमचे शरीर नवीन पेश तयार करते, तेव्हा जुन्या खराब पेशी आपोआप नष्ट होतात. पण जेव्हा कॅन्सर शरीरात प्रवेश करतो, तेव्हा शरीरातील लाल आणि पांढऱ्या पेशींचे संतुलन बिघडते आणि खराब झालेले  पेशी शरीरातून नष्ट होत नाहीत.  


जशा जशा खराब पेशीचे प्रमाण वाढू लागतात त्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये बदलू लागतात आणि कॅन्सरची लागण होते. WHOच्या मते कॅन्सर हे जगातल्या गंभीर आजारांपैकी आहे. त्यांच्या सर्व्हेनुसार साधारण प्रत्येका 6 व्या माणसात कॅन्सर आढळतो. पण यामध्ये मानेचा आणि डोके कॅन्सर हा जास्त धोकादायक आहेत. 


डोके आणि मानेचा कॅन्सर हा एक व्यापक गट आहे ज्यामध्ये तोंड, जीभ, गाल, थायरॉईड, पॅरोटीड, टॉन्सिल्स, स्वरयंत्र (व्हॉइस बॉक्स) आणि इतर कॅन्सरचा समावेश आहे.  या प्रकारचा कॅन्सर भारतातील लोकांना प्रभावित करणारे सर्वात सामान्य मानले जातात. दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे संचालक आणि युनिट हेड डॉ. प्रतीक वार्शने यांच्या मते, तंबाखूचे सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) संसर्ग ही कॅन्सरची मुख्य कारणे आहेत. परिणामी ही सर्व कारणे अशी आहेत की प्रतिबंध करणे शक्य आहे, त्यामुळे कर्करोग टाळता येऊ शकतो. 


मान आणि डोक्याच्या कॅन्सरची लक्षणे


जीवनशैली सुधारून आणि व्यसनांपासून दूर राहून कॅन्सर टाळता येऊ शकतो. तरुणांना तंबाखू सेवन, धूम्रपान आणि मद्यसेवनाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. आवाजात जडपणा, गिळण्यात अडचण, चेहऱ्यावर किंवा मानेवर गाठ किंवा सूज हे धोक्याची चिन्हे असू शकतात आणि त्याची त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे. अशा लक्षणांची तपासणी ऑन्कोलॉजिस्टने केली पाहिजे.  कॅन्सरची पुष्टी करण्यासाठी, अल्सर किंवा सूजलेल्या भागावर बायोप्सी केली जाते. यानंतर,  कॅन्सरच्या  स्टेजनुसार, अल्ट्रासोनोग्राफी, सीटी/एमआरआय आणि पीईटी सीटी स्कॅनचा सल्ला दिला जातो.


कॅन्सरवर उपाय


सुरुवातीच्या टप्प्यातील कॅन्सरवर शस्त्रक्रियेने पूर्णपणे उपचार केले जाऊ शकतात आणि कॉस्मेटिक आणि कार्यात्मक परिणाम देखील मिळू शकतात. कर्करोगाच्या प्रगत अवस्थेत, मूलभूत शस्त्रक्रियांव्यतिरिक्त, रेडिओथेरपी आणि केमोथेरपी आवश्यक आहे. या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे, ज्यामुळे रेडिओथेरपी आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी झाले आहेत.