Health News Doctors Handwriting Government Decision: राज्यातील फडणवीस सरकारने डॉक्टरांच्या हस्ताक्षरासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. धनंजय मुंडे आणि समाधान आवताडे यांनी प्रिस्क्रिप्शनच्या गुणवत्तेवर आणि हस्ताक्षराच्या सुस्पष्टतेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष उपसमित्या स्थापन केल्या आहेत का, असा लेखी प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने या विषयामध्ये लक्ष घातलं आहे. थेट विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी हस्ताक्षरासंदर्भातील विषय आता डॉक्टरीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातच दिलं जाणार आहे.
सुंदर हस्ताक्षरातील प्रिस्क्रिप्शनचे महत्त्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातच पटवून दिले जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. त्यामुळेच वाईट हस्ताक्षर असलेल्यांना डॉक्टर व्हावं हा जुना समज आता कालबाह्य होणार आहे. रुग्णांना दिले जाणारे औषधांचे प्रिस्क्रिप्शन स्पष्ट, वाचनीय आणि शक्यतो कॅपिटल अक्षरांतच असावे यासाठी आता या महत्त्वाच्या मुद्द्याचे धडे थेट अभ्यासक्रमात असणार आहेत. म्हणूनच औषधं आणि रुग्णासंदर्भात शिकतानाच हस्ताक्षर सुंदर असणं का महत्त्वाचं आहे हे ही मुलांना समजावून सांगितलं जाणार आहे.
प्रिस्क्रिप्शन पद्धतीचे परीक्षण व देखरेख करण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने डिसेंबर 2025 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांना औषध व उपचार समितीअंतर्गत दिले आहेत. प्रिस्क्रिप्शन स्पष्ट आणि वाचनीय हस्ताक्षरात असावे, यासाठी याचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याबाबतचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने त्याबाबतचे पत्र जारी केले आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
सध्या'नेक्स्ट जेन ई-हॉस्पिटल' ही अद्ययावत आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणाली कार्यरत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये रुग्णांना डिजिटल प्रिस्क्रिप्शन दिले जाते. औषधांच्या नावांमध्ये चुका होण्याची शक्यता डिजिटल प्रिस्क्रिप्शनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे सांगण्यात आले. रुग्णांना औषध समजावे, गोंधळ टळावा यासाठी डॉक्टरांच्या हस्ताक्षरामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
अनेकदा डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनमधील अक्षर न समजल्याने चुकीच्या क्षमतेची किंवा चुकीच्या कंपनीची औषधं दिली जाण्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळेच डॉक्टरांनी चांगल्या आणि सामान्यांनाही वाचता येईल अशा हस्ताक्षरावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
PAK
(20 ov) 212/8
|
VS |
SL
207/6(20 ov)
|
| Pakistan beat Sri Lanka by 5 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 159/7
|
VS |
ENG
161/6(19.3 ov)
|
| England beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 256/4
|
VS |
ZIM
184/6(20 ov)
|
| India beat Zimbabwe by 72 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.