Health Tips : आठवड्यातून तीन वेळा खा 'या' झाडांची पानं; वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ठरते फायदेशीर

Health Tips : फळं खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. या फळांच्या बिया यादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. पेरुच्या पानाचं सेवन केल्यास वजन कमी करण्यापासून अनेक फायदे मिळतात. 

नेहा चौधरी | Updated: May 12, 2025, 07:19 PM IST
Health Tips : आठवड्यातून तीन वेळा खा 'या' झाडांची पानं; वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास ठरते फायदेशीर

Health Benefits of Guava Leaves : आयुर्वेद डॉक्टर असो किंवा अॅलोपॅथी डॉक्टर ते सांगतात, आपल्या हंगामी फळं खायला पाहिजे. फळं खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं गेलं आहे. फळांमुळे आपल्या अनेक आरोग्यदायी फायदे होतात. फळांसोबत त्यांच्या बियादेखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल काही फळांच्या झाडांची पानंही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. असं एक फळ आहे ज्यांची पानं खाल्ल्याने अनेक फायदे होतात. हे फळ आहे पेरू... पेरूचं सेवन केल्यामुळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह मुबलक प्रमाणात मिळतं. तर  सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पेरूची पाने चावून खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुम्हाला आराम मिळतो. आयुर्वैदात सांगण्यात आलं आहे की, आठवड्यातून तीन वेळा पेरुची पानं खाल्ल्यास तुम्हाला अनेक फायदे होतात. (Health Tips Eat guava leaves three times a week It is beneficial for weight loss and boosting immunity)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते!

आयुर्वेदात असं सांगण्यात आलं आहे, तुम्ही पेरूची पानं खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पेरूची पानं खायला पाहिजे, असं डॉक्टर सांगतात. 

वजन कमी करण्यास मदतगार

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पेरूच्या पानाचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण पेरूच्या पानानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्यामुळे साहजिक तुमची भूक कमी होते. त्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून दूर राहता. त्याचा फायदा तुमचं वजन कमी करण्यास उपयुक्त ठरतं.  

पचनसंस्था सुधारते

पचन किंवा आम्लपित्त सारखी समस्या असणाऱ्या लोकांनी पेरूची पाने चघळणे खूप फायदेशीर मानले जाते. पाने चघळल्याने बद्धकोष्ठतेचा धोका कमी होण्यास मदत मिळते. एवढंच नाही तर डायरियाच्या समस्येपासूनही तुमचे संरक्षण होतं. पेरूची पाने चघळल्यावर पोटात अडकलेला वायूही बाहेर पडण्यास मदत मिळते. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

पेरूची पाने किंवा पेरूच्या पानांचा चहा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर ठरते. हे ब्राँकायटिस, दातदुखी, ऍलर्जी, जखमा, घसा खवखवणे आणि कमजोर दृष्टी इत्यादींवर उपचार करण्यात मदत करतात. जेव्हा तुम्ही पेरूची पाने चघळता तेव्हा ते तुमच्या शरीरातील हानिकारक पेशी आणि विषाणू काढून टाकण्यास मदत मिळते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)