शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

Heart Attack Signs: हृदयविकार हा जीवघेणा आजार आहे. या आजारामुळं लाखो लोकांचा मृत्यू होतो.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 10, 2024, 02:13 PM IST
शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत title=
health tips in marathi Dont ignore these warning signs of heart attacks

Heart Attack Signs: हृदयविकारामुळं भारतात हजारो जणांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅकला सायलंट किलर असंदेखील म्हटलं जातं. यापूर्वी पन्नाशी गाठलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक होता. मात्र, आता तरुणांमध्येही याची लक्षणे जाणवायला लागली आहेत. खराब लाइफस्टाईल आणि डाएट यामुळं हदयविकारांचा त्रास अधिक जाणवू लागतो. अशावेळी रोजच्या दिनचर्येत बदल करण्याची गरज आहे. मात्र, हार्ट अटॅक आधी सुरुवातीला काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे ओळखल्यास हा धोका वेळीच टळू शकतो. 

हार्ट अटॅकच्या आधी शरिरात काही लक्षणे जाणवतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. वेळीच ही लक्षणे ओळखून त्या दृष्टीने पावलं उचलण्यास फायदेशीर ठरु शकते. त्यासाठी हृदयविकाराची ही लक्षणे तुम्हाला आधी ठावूक असायलाच पाहिजे. 

लवकर थकवा येणे

काम केल्यानंतर थकवा येणे हे सामान्य आहे. मात्र अचानक घाम यायला लागला तर शरीरातील काही तरी गुंतागुंत आहे याचे लक्षणे आहे. ज्यांना आधी कमी घाम यायचा पण आता जास्त घाम येतो त्यांनी सतर्क राहून लगेचच डॉक्टरांसोबत बोलून घेतलं पाहिजे.

पचनसंस्था मंदावणे
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, जेव्हा हृदय योग्यरितीने काम करत नाही तेव्हा त्यासंबंधी काही विकार असू शकतात तसंच, पाचनसंस्थादेखील मंदावते. जर योग्य डाएट आणि लाइफस्टाईल असेल तर पाचनसंदर्भातील समस्या होत असेल तर हे हृदयविकाराचे संकेत असू शकतात. 

श्वास घेण्यास त्रास जाणवणे

हृदयविकारासंबंधित समस्या असेल तर श्वासोश्वासास समस्या जाणवते. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा श्वासासंदर्भात समस्या जाणवू शकते. श्वास घेण्यास त्रास किंवा अडथळा जाणवतो. अशा वेळी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

शरीराची डावी बाजू कमजोर होणे

हृदयविकाराचा एक संकेत म्हणजे शरीराची डावी बाजू म्हणजेच खांदा, जबडा आणि हाथ दुखणे अशी लक्षणे जाणवतात. शरीराची डावी बाजू कमजोर होते. या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. 

जास्त घाम येणे

जास्त घाम येणे हे देखील शरीरातील एका आजाराचा संकेत आहे. हृदयविकाराच्या झटक्याआधी जास्त घाम येणे यासारखे लक्षण दिसतात. अचानक असं झाल्यास रात्री जास्त घाम आल्यास डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)