प्लास्टिक किंवा कागदाच्या कपात चहा पिताय? आत्ताच थांबा, ही बातमी वाचाच
Paper Tea Cup Disadvantages: टपरीवरती पेपर कपमध्ये चहा पिता किंवा प्लास्टिकच्या कपात चहा पिता, तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Paper Tea Cup Disadvantages: चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे . कागदी तसेच प्लास्टिक कपावर बंदी घालावी, हे कप बनवताना विषारी केमिकल्स त्यामधे वापरले जातात त्यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो यासाठी या कपांवर बंदी आणावी अशी मागणी बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे
सध्या थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. आणि थंडी म्हटलं की चहा तर लागणारच. चौकात कट्ट्यावर दोस्त मित्रांच्या बरोबर थंडीमध्ये चहा घ्यायची एक मजाच वेगळी. मात्र हा चहा थेट कॅन्सरला निमंत्रण देऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? होय थेट कॅन्सरलाच निमंत्रण. मात्र तुम्ही घेत असलेल्या चहामुळे नव्हे तर तुम्ही ज्यामध्ये चहा घेतात त्या प्लास्टिकच्या कपामुळे...पूर्वी या कपाऐवजी काचेचा ग्लास किंवा चिनी मातीने बनवलेला खूप वापरला जायचा मात्र आता त्या कपाची जागा प्लास्टिकच्या कपांनी घेतल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढलेला आहे... अशी तक्रार घेऊन बुलढाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट या कपांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. कारण हे कप बनवताना त्यामध्ये बीपीए नावाचे केमिकल वापरले जाते , आणि हे केमिकल आरोग्याला हानिकारक असल्याने त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
रोठे यांच्या मागणीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिसाद तर मिळाला तस पत्र देखील निघालं मात्र त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. कारण या प्लास्टिकच्या कपाने सर्व चहा टपऱ्यांवर मोठं अतिक्रमण केलंय. एवढेच काय चहा पिल्यानंतर तो कप फेकून देण्यात येतो आणि त्याचं विघटन होत नसल्यामुळे पर्यवरणालाही त्याचा धोका उद्भवू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)