एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

How Many Almonds To Eat Per Day: बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे बोलले जाते. पण एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत? जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 10, 2024, 02:37 PM IST
एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा title=
health tips in marathi How many almonds should you eat in day

How Many Almonds To Eat Per Day: ड्राय फ्रुट्समध्ये बदाममध्ये खूप पौष्टिक तत्व असतात. यामुळं बदामाचा वापर स्वीट डिशपासून मिठाईमध्ये करण्यात येतो. तसंच, शेक, स्मूदी, बदामाचे दूध अशा पदार्थातही बदाम वापरता येते. बदाम खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. पण अनेकजणांना बदाम किती व कधी खावे हे कळत नाही. काही जण भाजून बदाम खातात तर काही जण पाण्यात भिजवलेले पदार्थ खातात. पाण्यात भिजवलेले पदार्थ मुलांना खायला दिले तर मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते. मात्र, बदाम खाण्याचा योग्य वेळ कोणता व कोणती पद्धत योग्य, हे जाणून घेऊया. 

बदामातील पोषक तत्व

28 ग्रॅम म्हणजेच जवळपास 23 बदामात 160 कॅलरी, फायबर 3.5 ग्रॅम, हेल्दी फॅट्स 14 ग्रॅम, प्रोटीन 6 ग्रॅम त्याचबरोबर कार्बोहायड्रेट, मॅग्नीशियम, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन ई सारखे गुण असतात. बदामात अँटीऑक्सीडेंट्स भरपूर असतात. खासकरुन त्यांच्या सालींमध्ये अँटीऑक्सीडेंट्स ऑक्सीडेटिव स्ट्रेस आणि इंफ्लेमेशनपासून बचाव करतात. 

एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत?

एका दिवसभरात तुम्हाला मुठभर बदाम खाल्ले पाहिजेत. यामुळं एनर्जी बुस्ट होण्यास मदत मिळते. मुठभर बदाम म्हणजे 7-8 बदाम तुम्ही खावू शकता. तुम्ही बदाम दुधात किंवा पाण्यात भिजवून खावू शकता. हेदेखील खूप फायदेशीर आहे. तुम्हाला असं बदाम खायला आवडत नसतील तर तुम्ही कच्च बदाम किंवा रोस्टेड बदामदेखील खावू शकतात. 

केव्हा खाल्ले पाहिजेत बदाम?

सकाळी बदाम खाण्याची योग्य वेळ आहे. रिकाम्या पोटी खाल्ले तर आणखीनच उत्तम. अशावेळी दिवसभराची एनर्जी मिळते. बदाम उर्जा मिळवण्याचा चांगली स्त्रोत आहे. त्यामुळं वर्कआउटच्या आधी तुम्ही बदाम खावू शकता. वर्कआउटनंतर प्रोटीन म्हणजेच ग्रीक योगर्टसोबतही तुम्ही बदाम खावू शकता. यामुळं मांसपेशिया मजबूत होतात. रात्रीच्या वेळी बदाम खाल्ले तर चांगली झोप येते. यातील मॅग्नीशियममुळं मेंदू तणावमुक्त होतो. 

बदाम खाण्याची योग्य पद्धत?

तुम्ही बदाम सफरचंद किंवा केळ्यासोबत खावू शकता. कारण यात फायबर चांगल्या प्रमाणात असते. हे शरीरात हेल्दी फॅट्ससोबतच नॅचरल शुगर बॅलेन्स करतात. तुम्ही बदामाचे दूध किंवा दहीदेखील खावू शकता. यामुळं शरीरातील कॅल्शियम आणि प्रोटीनचा इनटेक वाढेल. बदाम आणि डार्क चॉकलेट खाल्ल्याने हार्ट हेल्दी राहते. यात अँटी ऑक्सीडेंट भरपूर असतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)