)
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांची लागण होते, मागील अनेक वर्षांमध्ये आधुनिक जगामध्ये जीवनशैलीमध्ये बदल पाहायला मिळाला आहे. मग ते कपडे असो किंवा अन्न, त्यामुळे मग शरीर देखील त्याप्रमाणे प्रतिक्रिया देत असते. आजकाल हृदयाशी संबंधित आजार वाढत चालले आहेत, हे आजार आता फक्त वयोवृद्धाच्या वयोगटाशी भोवती राहिले नाहीत तर अगदी लहान वयातच हृदयाशी संबंधित आजार होतात. आता कधी कोणाला काय होईल यावर कोणीही काहीही सांगणे कठीण आहे, बदलत्या जीवन शैलीमुळे हृदयातील रक्ताचा अडथळा ही सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे.
ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये चरबी किंवा कोलेस्ट्रॉल जमा होते, आज या लेखामध्ये हृदयातील ब्लॅाकेज कसे ओळखावे यासंदर्भात या लेखामध्ये सांगणार आहोत. तज्ञ डॉ. विवेक मल्होत्रा यांनी आता हार्ड ब्लॅाकेज कसे ओळखायचे यासंदर्भात सांगितले आहे. रक्तप्रवाहामध्ये अडथळा असल्यास हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दोन पट वाढतो. तज्ञ डॉ. विवेक मल्होत्रा यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केली आहे यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देऊन आणि घरीच आपल्या आरोग्याची तपासणी करून ही समस्या कमी केली जाऊ शकते.
हे ही वाचा
धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक अशा काही गोष्टी आहेत त्याकडे आपले दुर्लक्ष होत असते. इकोकार्डिओग्राफी, सीटी कोरोनरी अँजिओग्राफी, ईसीजी, टीएमटी किंवा कोरोनरी अँजिओग्राम यांसारख्या चाचण्यांद्वारे हार्ड ब्लॅाकेज समस्या तुम्हाला लवकर समजू शकते. तथापि, तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही घरीसुद्धा त्याचे निदान करू शकता. सहज चालत असताना किंवा पायऱ्या चढताना किंवा कोणतेही कठीण काम करताना छातीत दुखत असल्यास, ही एक समस्या असू शकते, त्यामुळे अशा समस्येकडे दुर्लक्ष करणे हे तुमच्यासाठी धोका असु शकतो.
पूर्वीच्या तुलनेत, थोडीशी शारीरिक हालचाल केल्यावरही जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल, तर ते हृदयासाठी चांगले नाही असे तज्ञांनी सांगितले आहे. जास्त प्रयत्न न करता धाप लागणे किंवा झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करु नये. हृदयाचे दुखणे नेहमीच छातीपुरते मर्यादित नसते. कधीकधी ते डाव्या हातापर्यंत, खांद्यापर्यंत, मानेपर्यंत, पाठीपर्यंत किंवा जबड्यापर्यंत पसरू शकते या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.