Health : 15 दिवसांच्या बाळाच्या पोटाला हिंग लावली अन् मग...पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

Health : घरात नवजात बालक असल्यास त्याची काळजी घेण्यासाठी घरातील अनुभवी मंडळी अनेक उपाय सांगतात. पण पालकांनी हे घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अन्यथा, तुमची एक चूक महागात पडू शकते.   

नेहा चौधरी | Updated: May 17, 2025, 07:21 PM IST
Health : 15 दिवसांच्या बाळाच्या पोटाला हिंग लावली अन् मग...पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

Health : घरात नवजात बाळ असेल तर त्याची काळजी घेण्यासाठी आजीसह आई पालकांना अनेक घरगुती उपाय सांगतात. लहान बाळांना अनेकदा बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होणे, ही सामान्य बाब आहे. अशावेळी बाळ खूप रडत असतं. त्याला शांत करण्यासाठी आई, आजी किंवा मावशी, काकी आपल्याला घरगुती उपाय सांगतात. आजीपासून आईंच्या प्रसिद्धी घरगुती उपाय म्हणजे बाळ रडत असेल आणि त्याला बद्धकोष्ठता किंवा गॅसचा त्रास होत असल्यास त्याचा बेंबीला हिंग लावला जातो. या उपायामुळे बाळापोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत मिळते आणि बाळाला आराम मिळतो. पण नुकतीच एक घटना समोर आली आहे, 15 दिवसांच्या बाळाच्या पोटाला हिंग लावली अन् त्यानंतर जे घडलं ते अतिशय भयानक होतं. (hing or asafoetida was applied to the stomach of a 15 day old baby scary incident Health news)

नेमकं काय घडलं?

जेव्हा एका महिलेने तिच्या 15 दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटावर हिंग लावलं जेणेकरून त्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. काही काळानंतर, मुलाला संसर्ग झाला. बालरोगतज्ज्ञ डॉ. इम्रान पटेल यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दलचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. 

या व्हिडीओनुसार, डॉ. पटेल म्हणतात की, एक आई तिच्या 15 दिवसांच्या बाळाला घेऊन माझ्याकडे आले आणि माझ्या बाळाचे पोट सुजले असल्याची तक्रार केली. तसंच, बाळ खूप रडत होता. यानंतर, मी अधिक चौकशी केली तेव्हा मला कळलं की त्यांनी बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी पोटावर हिंग लावला होता. तेव्हापासून पोटावर हे संसर्ग दिसत असून बाळ नुसतं रडतंय. बालरोगतज्ज्ञ म्हणतात की, जोपर्यंत नाळ ताजी आहे तोपर्यंत काहीही लावू नका. ना तेल ना हिंग. हे क्षेत्र पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ ठेवले पाहिजे.

हेसुद्धा वाचा - ठणठणीत असताना ती' अचानक बेशुद्ध पडली, डॉक्टरने टेस्ट केल्यावर कळलं, 'तिच्याजवळ फक्त...'

डॉ. पटेल म्हणतात की, 'लोकांचा असा विश्वास आहे की हिंग लावल्याने गॅसपासून सुटका मिळेल. मला यात काही अडचण नाही पण जर तुम्ही हे सर्व ताज्या नाभीसंबधीच्या दोरीवर लावले तर संसर्ग होण्याची शक्यता वाढते.'

बालरोगतज्ज्ञ पुढे स्पष्ट करतात की, अशा संसर्गांमुळे मुलं आणि पालक दोघांनाही त्रास होतो . म्हणून, कृपया डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणताही घरगुती उपाय करू नका.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)