अस्थमावर घरगुती पद्धतीने करा इलाज

भारतात लोकसंख्येच्या जवळपास १५ ते २० टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३ कोटी लोकांना अस्थमाची समस्या

Updated: May 9, 2019, 12:31 PM IST
अस्थमावर घरगुती पद्धतीने करा इलाज

मुंबई : फुफ्फुसातील वायू नलिकांमध्ये सूज येण्यामुळे अस्थमा (दमा) होतो. अस्थमाचं सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर (सीवियर) अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो. परंतु गंभीर लक्षणे नियंत्रित करण्यासाठी अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असते. अस्थमा असलेल्या रुग्णांपैकी गंभीर अस्थमा असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास ८ ते १० टक्के इतकी आहे. जगात २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा १३वा क्रमांक आहे. भारतात लोकसंख्येच्या जवळपास १५ ते २० टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३ कोटी लोकांना अस्थमाची समस्या होत आहे. येणाऱ्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणाचा स्तर आणखी अस्थमाग्रस्तांच्या संख्येत लाखोंच्या संख्येत वाढ होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

नोएडामधील मेट्रो रेस्पिरेटरी सेंटरचे वरिष्ठ सल्लागार डॉ. दीपक तलवार यांनी ज्या लोकांना इनहेलर्स घेतल्यानंतरही १ ते २ महिन्यांपर्यंत खोकला येतो ते रुग्ण अस्थमाच्या गंभीर श्रेणीमध्ये येत असल्याचं त्यांनी सांगतिलं. काही रुग्ण अस्थमा नियंत्रणात ठेवण्यासाठी वर्षातून दोनहून अधिक स्टेरॉइड घेतात तेदेखील गंभीर श्रेणीत येतात. तसेच सूज नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक काळ दररोज औषध घेण्याची आवश्यकता असते. ३ ते ६ महिने उपचार करुनही अस्थमा नियंत्रणात ठेवण्यात अयशस्वी ठरतात त्यावेळी तो अस्थमाही गंभीर स्वरुपाचा मानला जातो. परंतु काही सुरुवातीच्या स्थितीत घरगुती उपायांनी दमा बरा करण्यास मदत होते. 

लसून - 

अस्थमा, दम्यासाठी लसून अतिशय उपयुक्त आहे. ३० मिली दूधात लसणाच्या पाच पाकळ्या उकळून घ्या. हे मिश्रण रोज सेवन केल्याने दम्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत अतिशय फायदा होतो.

आले - 

आल्याच्या गरम चहामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकून सकाळी, संध्याकाळी प्यायल्यानेही फायदा होतो. 

ओवा -

पाण्यात ओवा टाकून त्याला चांगले उकळवून त्याची वाफ घेतल्यानेही सुरुवातीच्या काळात फायदा होतो.

मेथी - 

मेथी पाण्यात उकळून घ्या. त्यात आल्याचा रस आणि मध टाकून पियाल्याने अस्थमाच्या समस्येपासून फायदा होतो. 

मध - 

दम्यासाठी मध अतिशय गुणकारी मानला जातो. दमा असलेल्या रुग्णाच्या नाकाच्या खाली थोडं मध ठेवावे. श्वास घेताना हवा मधाच्या संपर्कात येते. त्यावेळी श्वासावाटे हवा आत घेताना मधामुळे दम्याच्या झटक्यापासून आराम मिळतो. 

लवंग -

४ ते ५ लवंग १२५ मिली पाण्यात ५ मिनिटांपर्यंत उकळवा. हे मिश्रण गाळून त्यात मध टाकून हा गरम काढा रोज दोन ते तीन वेळा पियाल्याने फायदा होतो.

शेवग्याची पाने -

पाण्यात शेवग्याची पानं टाकून उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात मीठ, काळीमिरी पावडर आणि लिंबू रस टाकून प्यायल्याने अस्थमाच्या समस्येवर अतिशय गुणकारी ठरतो.