वडील होण्यात समस्या येताय? तर या पदार्थांचे एकत्र सेवन करुन वाढवू शकता शुक्राणूंची संख्या

या पदार्थांचे एकत्र सेवन करा आणि वाढवा शुक्राणूंची संख्या

Updated: Sep 7, 2022, 10:32 PM IST
वडील होण्यात समस्या येताय? तर या पदार्थांचे एकत्र सेवन करुन वाढवू शकता शुक्राणूंची संख्या title=

बहुतेक घरांमध्ये मनुका म्हणजेच बेदाणे (Raisins) वापरले जातात. कोणताही गोड पदार्थ हा मनुक्याशिवाय अपूर्ण आहे. तसेच, मनुका जेवणाची चव वाढवण्याचे काम करतात. पण मनुका हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. मनुका प्रथिने, लोह आणि फायबरने समृद्ध असतात. तर दुसरीकडे मनुका मधासोबत सेवन केल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात. 

दुसरीकडे, पुरुषांनी मनुका आणि मधाचे (Honey And Raisins) एकत्र सेवन केल्याने अनेक फायदे होतात. जाऊन घ्या मनुका आणि मध एकत्र खाण्याचे फायदे...

एनर्जी बूस्टर

मध आणि मनुका एकत्र खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मनुका आणि मधामध्ये आढळणारे ग्लुकोज, लोह आणि पोटॅशियम शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. तर दुसरीकडे मनुका आणि मध एकत्र सेवन केल्यास पुरुषांची भूक वाढते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते

मध आणि मनुका एकत्र सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. मनुका आणि मधामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे शरीराला अनेक आजार आणि संक्रमणांशी लढण्यास मदत होते.

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी उपयुक्त

मध आणि मनुका देखील पुरुषांची लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. बेदाण्यामध्ये तांबे आणि लोह आढळतात. मधामध्ये अमिनो अॅसिड असते, परंतु या सर्व गोष्टी पुरुषांमधील लैंगिक दुर्बलता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच वेळी, याचे दररोज सेवन केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.)