हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ

कोलेस्ट्रॉल एक असा चरबीचा थर आहे जो रक्तवाहिन्यांना आणि धमण्यांना चिकटून असते. याची साफसफाई होणे गरजेची असते. अशावेळी हा घरगुती उपाय ठरतो अतिशय महत्त्वाचा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 17, 2025, 12:45 PM IST
हाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ

घाणेरडं कोलेस्ट्रॉल शरीरात झपाट्याने वाढणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. LDL म्हणजे घाणेरडं कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये एकत्र जमा होते यामुळे नसांवर दाब येतो. यामुळेच हृदयाच्या समस्या किंवा स्ट्रोकचा धोका अधिक असतो. तसेच यामुळे रक्तप्रवाहावर देखील निर्बंध येतात. रक्तप्रवाह बिघडला तर ती व्यक्ती हाय बीपीची शिकार होऊ शकते. अशावेळी घरगुती उपाय अतिशय महत्त्वाचे ठरतात. 

Add Zee News as a Preferred Source

लसणाचा वापर -

कोलेस्ट्रॉलसाठी लसूण अतिशय फायदेशीर आहे. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसणाचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सर्वप्रथम, त्यात ऍलिसिन असते जे एक सल्फर कंपाऊंड आहे.  जे कमी घनतेचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय, ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये एक प्रकारची उष्णता निर्माण करते, ज्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात. म्हणून, दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसूणची 1 पाकळी खा.

जवस बियांचा वापर

उच्च कोलेस्ट्रॉलसाठी जवस बिया खाणे चांगले असते. उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये जवस बियांचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे.जवसाच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते जे उच्च कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय, ते ट्रायग्लिसराइड्स कमी करते आणि कोलेस्टेरॉल वाढू देत नाही. म्हणून, कोमट पाण्यात किंवा दुधात 1 चमचा जवसाच्या बियांची पावडर मिसळा आणि ते सेवन करा.

धण्याचे पाणी 

उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये धणे लवकर काम करू शकते.धणे बियांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फॉलिक ऍसिड आणि बीटा-कॅरोटीन असते जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढविण्यास मदत करू शकते. तर, या सर्व कारणांमुळे, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय अवलंबले पाहिजेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही हे फायदेशीर आहेत.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More