Vitamin C Rich Foods : हे पदार्थ खा, कोरोनाची भीती राहणार नाही !
Vitamin C Rich Foods : देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सरकारने खबरदारी म्हणून पुन्हा कोरोना चाचणीवर भर दिला आहे. मात्र, जर तुम्ही व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती लवकर वाढेल, कोरोनाची भीती राहणार नाही. कोणते हे पदार्थ आहेत ते जाणून घ्या.
Vitamin C Rich Foods : कोरोनाला आपल्यापासून चार हात लांब ठेवायचे असेल तर व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांना प्राधान्य द्या. व्हिटॅमिन सी खाल्ल्याने शरीरासाठी अनेक महत्त्वाचे फायदे होतात आणि त्यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण होते. व्हिटॅमिन सी असलेली फळे आणि भाज्या तुम्ही भर दिला तर कोरोनाचे कोणतेही टेन्शन राहणार नाही.
व्हिटॅमिन सी हा एक अतिशय महत्त्वाचा पोषक घटक आहे. याचा शोध 1930 च्या दशकात हंगेरियन बायोकेमिस्ट अलबर्ट शेंज्ट गियोरगी (Albert Szent-Györgyi) यांनी लावला. आपल्या शरीरातील अनेक प्रक्रिया पार पाडण्यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत जे पेशींचे पुनरुत्पादन, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि लोह शोषण्यास मदत करतात. ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमधील प्रसिद्ध आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की, कोणती फळे आणि भाज्या खाल्याने मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. ते जाणून घ्या.
या भाज्या खा आणि एकदम मस्त राहा
तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भाज्या खाणे गरजेचे आहे. आज आम्ही अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, तसेच फ्लेव्होनॉइड्स आणि बायोफ्लेव्होनॉइड्स (अँटीऑक्सिडंट्स) आढळतात. या भाज्या खल्ल्याने शरीरात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होईल.
भोपळी मिरची : 1-कप चिरलेल्या लाल मिरचीमध्ये 191 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.
लाल आणि हिरवी मिरची : एक लाल किंवा हिरवी मिरचीमध्ये 64.8 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.
हिरव्या पानाच्या भाज्या : यामध्ये गार्डन क्रेस, मोहरीच्या हिरव्या भाज्या, ब्रसेल्स स्प्राउट्स, कोबी आणि ब्रोकोली यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, 1 कप चिरलेल्या ब्रोकोलीमध्ये 81.2 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते.
बटाटे : एका मध्यम आकाराच्या बटाट्यामध्ये 17.7 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.
कोणती फळे खावीत, ते जाणून घ्या.
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. फळे आणि फळांच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी आढळतात, जे बाजारात सहज उपलब्ध आहेत आणि अनेकांना ही फळे खाण्यास आवडतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
पेरु : पेरु हे अतिशय सामान्य फळ आहे. पेरुचा आतील भाग हा गुलाबी आणि पांढरा असतो. एक पेरु खाल्ल्याने 125 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
स्ट्रॉबेरी : या फळामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट आढळतो. एक कप चिरलेली स्ट्रॉबेरी खाल्ल्यास शरीराला 97.6 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
पपई : हे असे फळ आहे ज्यासाठी तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागत नाहीत. एक कप कापलेली पपई खाल्ल्यास शरीराला 88.3 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
संत्री : संत्र्याला व्हिटॅमिन सीचे पॉवर हाऊस म्हटले जाते, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते. एक संत्रे खाल्ल्याने 82.7 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळते.
किवी : हे फळ दिसायला अगदी लहान असले तरी आरोग्याच्यादृष्टीने खूपच फायदेशीर आहे. एक किवी खाल्ल्याने तुम्हाला 64 मिलीग्राम व्हिटॅमिन सी मिळेल.
लिंबू : लिंबाचा रस नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, एका लिंबामध्ये 34.4 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)