Madhya Pradesh Coldrif Cough Syrup Case: मध्य प्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील आमला या प्रदेशातून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. कफ सिरपमुळे अवघ्या 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना प्रदेशातील नागपूर एम्स रूग्णालयातील आहे. चार महिन्यांपासून कोमामध्ये असलेल्या या चिमुकल्याने अखेर 128 दिवसांनंतर श्वास थांबवला. हर्ष यदूवंशी असे या चिमुकल्याचे नाव असून तो बैतूल जिल्ह्यातील टिकाबर्री गावचा रहिवासी होता. छिंदवासी जिल्ह्यात कफ सिरप सेवेनंतर हर्षची प्रकृती अचानक बिघडली. कोल्ड्रिफ नावाचे कफ सिरप घेतल्यानंतर तो एका गंभीर आजाराला बळी पडला. त्याचे उपचार नागपूर एम्स या रूग्णालयात सुरू होते. हर्षच्या उपचारासाठी त्याच्या कुटुंबाने मोठा पैसा खर्च केला तरीही, ते हर्षचा जीव वाचवू शकले नाही.
हर्षच्या कुटुंबियांनी प्रतिष्ठित माध्यमसमुहाला दिलेल्या वृत्तानुसार, 26 सप्टेंबर 2025 रोजी त्याला सौम्य सर्दी आणि खोकल्यासाठी पारसिया येथील एका दवाखान्यात नेण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे सेवन केल्यानंतर, काही दिवसातच मुलाने लघवी करणे बंद केले. वारंवार दवाखान्याला भेट देऊनही त्याची प्रकृती बिघडत चालली होती. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये हर्षचे मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाल्याचे दिसून आले, ज्यामुळे कुटुंबाला त्याला एम्स रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी बैतूल येथील नागपूर आणि भोपाळमधील रुग्णालयात जावे लागले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
हर्षच्या मृत्यूनंतर कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले. या दरम्यान कफ सिरपमुळे हर्षने जीव गमालवा अशी धक्कादायक बाब समोर आली. चाचण्यांमधून सिरपमध्ये 48.6 टक्के डायधिलीन ग्लायकोल असल्याचे सिद्ध झाले, जे मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरणारे विषारी ओद्योगिक सॉल्व्हेंट आहे. बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी, त्यांचीहा अहवाल तेथील सरकारलाही पाठवण्यात आला. दरम्यान कुटुंबियांनी बैतूल मधील परसिया येथील एका रहिवासी डॉक्टरने कोल्ड्रिप हे कफ सिरप लिहून दिले होते असा आरोप केला आहे. तसेच यापूर्वी हर्षच्या कुटुंबियांनी संबंधित डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली होती आणि लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली होती. तरी तेथील शासनाने हे प्रकरण कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित आहे अशी माहिती दिली. सध्या प्रशासनाकडून पुढील कारवाई केली जात आहे.
मध्य प्रदेशात यापूर्वीही कोल्ड्रिफ या विषारी कफ सिरमुळे तब्बल 26 मुलांनी जीव गमावला होता. यानंतर बैतूल जिल्ह्यातील कफ सिरपमुळे होणारा हा तिसरा मृत्यू होता. यापूर्वी या भागातील 58 वर्षीय शेतकरी देवा यदुवंशी हे देखील या जीवघेण्या कफ सिरपचे शिकार झाले आणि एका रविवारच्या रात्री त्यांनी त्यांचा जीव गमावला. तसेच छिंदवाडा पारसिया या भागात हा आकडा 23 इतका आहे. हे प्रकरण अलिकडच्या काळात भारतातील सर्वात घातक औषध दुर्घटनांपैकी एक आहे. या घटनेने मध्य प्रदेशातील वैद्यकीय सेवेबाबात प्रश्न निर्माण झाला आहे. या निष्काळजीपणामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी 'सकाळ मीडिया' ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ - एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, 'साम टीव्ही मराठी'मध्ये (जुलै २०२५ - सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.
...Read More|
SA
(20 ov) 187/6
|
VS |
AFG
187(19.4 ov)
|
| Afghanistan tied with South Africa (South Africa won the 2nd Super Over by 4 runs) | ||
| Full Scorecard → | ||
|
PAK
(20 ov) 190/9
|
VS |
USA
158/8(20 ov)
|
| Pakistan beat USA by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 113/7
|
VS |
QAT
115/3(16.4 ov)
|
| Qatar beat Bahrain by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.