Intercourse Tips | सेक्सनंतर या चूका करीत असाल तर सावधान; इन्फेक्शन होण्याचा धोका

 वैवाहिक जिवन जगताना दोघांमध्ये इंटिमसी असणं खुपच गरजेचं आहे.

Updated: Jun 29, 2021, 12:32 PM IST
Intercourse Tips | सेक्सनंतर या चूका करीत असाल तर सावधान; इन्फेक्शन होण्याचा धोका

Intercourse Tips : वैवाहिक जिवन जगताना दोघांमध्ये इंटिमसी असणं खुपच गरजेचं आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद टिकून राहतो. परंतु इंटिमेट होण्यासोबतच महिलांनी आपल्या वयक्तिक हायजीनकडेदेखील लक्ष द्यायला हवे. महिला अनेकवेळेला सेक्सनंतर चूका करतात. त्यामुळे काही आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. इन्फेक्शनदेखील होऊ शकतं.

 सेक्सनंतर पुढील चूका टाळायला हव्या.

 1 हात आणि इतर अवयव स्वच्छ करा
 सेक्सनंतर हात, तोंड, नाक व्यवस्थित धुणं गरजेचं आहे.  कारण या दरम्यान आपले हात जोडीदाराच्या अवयवांच्या संपर्कात येतात. ज्यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शनचा धोका असतो. 
 
 2 टाइट कपडे वापरू नका
 जर तुम्ही सेक्सनंतर टाइट कपडे घातले तर, त्रास होऊ शकतो. सेक्सदरम्यान आणि नंतर आपल्या शरिराचे तापमान वाढलेले असते. तुम्हाला घाम खूप येतो. अशातच टाइट कपडे घातल्याने खाज, एलर्जी किंवा इतर इन्फेक्शन होऊ शकते.
 
 3 अवयवांची स्वच्छता
 सेक्सनंतर बहुतांश महिला योनीची स्वच्छता करीत नाही. काही महिला साबणाने स्वच्छता करतात. असे करणे योग्य नाही. यामुळे तुम्हाला वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागू शकते. सेक्सनंतर कोमट पाण्याने अवयव यातून व्यवस्थित स्वच्छ करावे किंवा इंटिमेट वॉशने स्वच्छ करावे.
 
 4 वेट वाइप्स 
 सेक्सनंतर योनीची स्वच्छता करण्यासाठी वेट वाइप्सचा वापर धोकादायक ठरू शकतो. वेट वाइप्समध्ये एक केमिकल असते ज्यातून आर्टिफिशिएल सुगंध येतो. परंतु याने एलर्जी किंवा रॅशेस  होऊ शकतात.
 
 5 मूत्र विसर्जन
 पुरूष असो किंवा महिला सेक्सनंतर मूत्र विसर्जन करणे गरजेचे आहे. खरंतर ही नैसर्गिक प्रकिया आहे. परंतु तरी काही पुरूष किंवा महिला याचा कंटाळा करतात. सेक्सनंतर मूत्रविसर्जन न केल्यास बॅक्टेरिअल इंन्फेक्शनचा धोका होऊ शकतो.