मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मानवी आयुष्यात लैंगिक संबध ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं

Updated: May 17, 2021, 01:49 PM IST
मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
representative image

Sex During Your Periods: मानवी आयुष्यात लैंगिक संबध ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणं गरजेचं ठरतं. ज्याप्रकारे सेक्स ही नैसर्गिक क्रिया आहे तसेच, स्त्रीयांसाठी मासिक पाळी देखील नैसर्गिक क्रिया आहे. परंतु मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबधाबाबत अनेक गैरसमज आहेत.  

तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं, परंतु मासिक पाळीदरम्याम सेक्स करणं आरामदायी ठरू शकतं. यामुळे स्त्रीयांमधील क्रॅम्प्सपासून दिलासा मिळू शकतो. तसेच पीएपसीच्या लक्षणांमध्येही दिलासा मिळतो.

लैंगिक संबधांवेळी किंवा त्यानंतर हार्मोन, एंडोर्फिन आणि स्ट्रेस बस्टिंग केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करू शकते.

काही लोकांना शंका असते की, पाळी दरम्यान लैंगिक संबध ठेवल्यास संसर्ग होऊ शकतो. आणि त्यामुळे प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.  परंतु नक्की सत्य काय ? डॉक्टरांचे मत वाचा

1 मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबंध ठवल्याने पोटाच्या त्रास कमी 

काही महिलांना मासिक पाळीदरम्यान, पोटाचा त्रास सुरू होतो. रोजची जीवनशैली, व्यायाम न करणे, धुम्रपान, आणि मद्यसेवनामुळे हा त्रास होऊ शकतो. परंतु लैंगिक संबधांच्या परमोच्च आनंदामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.

2. कंडोमचा वापर करा

 मासिक पाळी दरम्यान लैंगिक संबध ठेवताना कंडोम महिलांना सुरक्षा प्रदान करतो. पाळीदरम्यान, इन्फेक्शनपासून बचावासाठी कंडोमचा वापर करणे योग्य ठरते.

 3. मोकळेपणाने बोला

 अनेक स्त्रीया पाळीदरम्यान आपल्या पार्टनरशी लैंगिक भावनेबद्दल बोलण्यास संकोच करतात. त्यामुळे आपल्या पार्टनरशी मोकळेपणाने बोला. आणि लैंगिक सुखाचा परमोच्च आनंद घ्या.
 
 या दिवसांमध्ये मनावर आवर घालून लैंगिक संबध थांबवण्याची गरज नाही.
-----------------------------.
(वरील लेख सामान्य माहितीच्या आधारे प्रसिद्ध आहे. कोणत्याही आरोग्यविषयी अडचणींसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या)