फक्त पुरुषांनाच टक्कल का पडते? स्त्रियांना का पडत नाही? काय आहे कारण जाणून घ्या

टक्कल पडण्याच्या या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेणे आवश्यक आहे.

Updated: Sep 27, 2021, 07:01 PM IST
फक्त पुरुषांनाच टक्कल का पडते? स्त्रियांना का पडत नाही? काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई : जगातील अनेक लोक टक्कल पडण्याच्या समस्येला तोंड देत आहेत. टक्कल पडायला लागल्यावरती काही लोकं खूप खर्च करतात पाण्यासारखा पैसा घालवतात परंतु त्याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. एकदा का टक्कल पडायला लागला की, मग त्याचे आपण काहीही करु शकत नाही. फक्त त्यावर एकच उपाय उरतो तो म्हणजे विग किंवा नकली केस लावणे (Hair Transplant). परंतु तुम्हा कधी असा विचार केल्या का? केस गळू लागल्यावरती पुरुषांना टक्क्ल पडते परंतु किती ही केस गळले तरी महिलांना मात्र टक्कल पडत नाही. असं का घडत असावं असा तुम्ही कधी विचार केलाय का? टक्कल पडण्याच्या या प्रक्रियेला वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांनाही केस गळतात पण...

केस गळण्यामागे अनेक कारणे आहेत. तणाव, पोषणाची कमतरता आणि हार्मोनल समस्या ही यात प्रमुख कारणे आहेत. या कारणांमुळे किंवा जास्त वय झाल्यामुळे स्त्रियांना केस गळण्याच्या समस्या उद्धभवतात.

एवढेच काय तर प्रेग्नेंसीनंतर अनेक महिलांना केस गळण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. केस गळल्यामुळे महिल्यांच्या डोक्यावर कमी केस उरतात. तरीही, स्त्रियांना टक्कल पडते असे क्वचितच घडते. परंतु पुरुषांच्या बाबतीत असे नसते. दहापैकी 7 ते 8 मुल आपल्याला पूर्णपणे टक्कल पडले दिसतात.

हार्मोनल बदलांची मुख्य कारणे

शास्त्रानुसार, डोक्यावर किंवा शरीरावर केस वाढण्यामागे हार्मोनल कारणे आहेत आणि हेच कारण केस गळण्यामागील कारण देखील आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये, टक्कल पडण्यावर केलेल्या एका संशोधनात असे सांगण्यात आले की, सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे याचे प्रमुख कारण बनते.

नॉर्वेच्या बर्गन विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ पेर जेकबसन यांच्या मते, टेस्टोस्टेरॉन (Testosterone Hormone) हे पुरुषांमध्ये स्राव होणाऱ्या एंड्रोजन गटाचे स्टेरॉईड हार्मोन (Steroid hormone) आहे. या हार्मोनमुळे पुरुषांमध्ये केस गळती होते.

टक्कल पडण्याची अनुवांशिक कारणे

एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, टक्कल पडण्याची समस्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देखील जाते. म्हणजे, जर वडिलांना टक्कल पडण्याची समस्या असेल, तर मुलालाही ते होऊ शकते. म्हणजेच, ही एक अनुवांशिक समस्या देखील आहे.

मानवी शरीरात काही एन्झाईम असतात जे टेस्टोस्टेरॉनला डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये (Dihydrotestosterone) रूपांतरित करतात, जे केस कमकुवत आणि पातळ होण्याचे कारण आहे. सामान्यतः हार्मोन्समध्ये असे बदल करणारे एन्झाईम जीन्समध्ये आढळतात. यामुळे, हे मुख्यतःअनुवांशिक असते.

स्त्रियांना टक्कल का पडत नाही?

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे हार्मोनची उपस्थिती नगण्य आहे. त्यामध्ये काहीवेळा टेस्टोस्टेरॉनचा असतो, परंतु त्याच्याबरोबर, एस्ट्रोजन नावाचा हार्मोन देखील असतो. ज्यामुळे, महिलांमध्ये टेस्टोस्टेरॉनला डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया देखील नगण्य आहे.

मुळात, डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉनची कमतरता किंवा उत्पादन न होणे हेच कारण आहे की, स्त्रियांमध्ये टक्कल पडण्याची समस्या नसते. कधीकधी गर्भधारणेदरम्यान किंवा म्हातार वयात, डायहाइड्रोटेस्टोस्टेरॉन (Dihydrotestosterone)  तयार करण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते आणि या प्रकरणात त्यांना केस गळण्याची समस्या देखील असते. तथापि, अशी शक्यता अत्यंत दुर्मिळ असते, ज्यामुळे महिलांना टक्कल पडलेले आपल्याला फार कमी पाहायला मिळते.