Magnesium Deficiency Symptoms : मॅग्नेशियम हे शरीरासाठी एक अत्यंत आवश्यक मिनरल आहे. शरीरात होणाऱ्या अनेक जैविक क्रिया (biological reactions) मॅग्नेशियमच्या मदतीनेच पार पडतात. हे मसल्स म्हणजेच स्नायूंना मजबूत ठेवणे, नसा म्हणजे नर्व्ह्स सक्रिय ठेवणे, हाडं बळकट करणं, तसेच रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित ठेवण्यासाठीही महत्त्वाचं आहे. पण आजच्या धावपळीच्या, असंतुलित लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, याची लक्षणं दिसूनही अनेक वेळा आपण ती दुर्लक्ष करतो. चला तर मग जाणून घेऊया मॅग्नेशियमची कमतरता ओळखण्याची 4 प्रमुख लक्षणं.
रात्री झोपताना पायात किंवा हातात गोळे येणं किंवा मसल्समध्ये अचानक झटके येणं. ही लक्षणं मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. मॅग्नेशियम मसल्सना रिलॅक्स करतात, वेदना कमी करतं आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेत मदत करतं. त्यामुळे याची कमतरता असल्यास सतत क्रॅम्प्स किंवा स्नायूंमध्ये दुखापत जाणवू शकते.
कधी काही न केल्यावरही अंगात ताकत न वाटणं, सतत थकवा जाणवणं किंवा अंगात जडपणा वाटणं. हेही मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं असू शकतात. कारण मॅग्नेशियम शरीरात ऊर्जा निर्माण होण्यासाठी अत्यावश्यक असतं. याची पातळी कमी झाली की पेशींना योग्य प्रकारे ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि त्यामुळे अशक्तपणा जाणवतो.
मॅग्नेशियम फक्त शरीरासाठीच नाही तर मेंदूसाठीही खूप महत्त्वाचं आहे. हे न्यूरोट्रान्समीटर (मेंदूतील केमिकल मेसेंजर) संतुलित ठेवण्यासाठी मदत करतं. मॅग्नेशियम कमी झालं की मूड स्विंग्स, अस्वस्थता, चिडचिडेपणा आणि स्ट्रेस जास्त जाणवतो. काही वेळा हे डिप्रेशन आणि अँक्सायटीसारख्या मानसिक समस्यांनाही कारणीभूत ठरू शकतं.
मॅग्नेशियम हृदयाच्या ठोक्यांनाही नियमित ठेवण्यात मदत करतं. त्याची कमतरता झाली की हृदयाच्या धडधडीचा वेग अनियमित होऊ शकतो. कधी फार वेगाने तर कधी अचानक बदल होतो. ही स्थिती धोकादायकही ठरू शकते.
हेही वाचा : अभिनेते जितेंद्र यांनी तब्बल 855 कोटींना विकली मुंबईतील जमीन, बालाजी IT पार्कच्या जागी आता तिथे...
जर तुमच्यात यापैकी एकाहून अधिक लक्षणं दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या आहारात मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. जसं की नट्स, संत्री, केळी, हिरव्या पालेभाज्या, बीन्स आणि ओट्स.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)