दिवाळीत काचेसारखी नितळ त्वचा हवीय? ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 सोप्या टिप्स

दिवाळी म्हटलं की, उत्साह आणि नटणं सजणं आलंच. अशावेळी कोणतंही फेशिअल न करता कशी मिळवाल काचेसारखी नितळ त्वचा. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितल्या खास टिप्स.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 15, 2025, 06:07 PM IST
दिवाळीत काचेसारखी नितळ त्वचा हवीय? ऋजुता दिवेकरने सांगितल्या 3 सोप्या टिप्स
diwali beauty tips rujuta diwekar

सण आपल्याला आनंद देतात. दिवाळी म्हटलं की, त्याची सुरुवात खूप आधीपासून होते. अगदी साफसफाईपासून  ते फराळापर्यंत सगळ्याच गोष्टी दमवणाऱ्या असतात. या सगळ्यानंतर दिवाळीत अनेक पाहुण्यांना भेटी द्यायच्या असतात. एवढंच नव्हे तर सध्या दिवाळी पार्टीचा देखील ट्रेंड आहे. अशावेळी ऐन दिवाळीत आपला ग्लो कमी होतो. चेहरा सुकल्यासारखा आणि कोमेजलेला दिसतो. असं म्हणून म्हणून नेमकं काय करालं? न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर  यांनी सांगितल्या खास टिप्स. 

Add Zee News as a Preferred Source

स्वतःला हायड्रेट ठेवा 

सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे स्वतःला हायड्रेट ठेवणं. कोणताही सण असो किंवा दैनंदिन दिवस स्वतःला हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही डिहायड्रेट झालात तर तुम्हाला ब्लोटिंग, गॅस आणि निस्तेज त्वचेला सामोरं जावं लागेल. त्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात पिणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची त्वचा देखील तजेलदार राहील. 

केळं न चुकता खा 

ऋजुता दिवेकरने सांगितलेला आणखी एक पर्याय म्हणजे न चुकता दररोज केळं खा. दिवाळीत अनेक पार्टी होतात. अशावेळी पार्टीला जाण्यापूर्वी केळं खाणं पसंत करा. केळं प्रीबायोटिक आहे. त्यामुळे पचनाला नक्कीच मदत होते. सणासुदीला आपण वेळीअवेळी खातो. अशावेळी पचनाचा त्रास होऊ नये म्हणून केळ्याचा वापर करावा. यामुळे तुम्हाला जड वाटणार नाही. 

ताकात हा पदार्थ घालायला विसरु नका 

दिवाळीत आजारी पडू नये म्हणून ऋजुता दिवेकरने ताक पिण्याचा सल्ला दिला आहे. या ताकात सैंदव मीठ, जीरं आणि चिमुटभर हिंग घालायला विसरु नका. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच यामुळे चेहरा अगदी कोरियन लोकांसारखा चमकेल. 

ऋजुता दिवेकरचा व्हिडीओ 

FAQ 

त्वचा चमकदार कशी ठेवावी याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न

चमकदार त्वचेसाठी हायड्रेशन किती महत्त्वाचे आहे?

पाणी पिण्यामुळे त्वचा लवचिक राहते, कोरडेपणा कमी होतो, विषारी पदार्थ काढून टाकले जातात आणि लवचिकता वाढते. हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे, विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा तुम्ही जास्त गोड आणि तळलेले पदार्थ खाण्याची शक्यता असते.

पार्टीपूर्वी केळी खाल्ल्याने माझ्या त्वचेला फायदा होतो का?

हो, केळीमध्ये बी६ सारखे जीवनसत्त्वे भरपूर असतात, जे पचन सुधारतात, ऊर्जा पातळी वाढवतात आणि चांगला मूड राखतात. पार्टीपूर्वी केळी खाल्ल्याने तुम्हाला अन्नाचा आनंद घेता येतो आणि त्वचा चमकदार राहते.

ताक पिण्याचे काय फायदे आहेत?

ताक आम्लता कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. काळे मीठ, जिरे आणि हिंग घालल्याने हे फायदे वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही ताजेतवाने आणि दुसऱ्या दिवसासाठी तयार दिसता.

रात्री उशिरा पार्टीनंतर त्वचा तजेलदार कशी ठेवाल?

थोडे काळे मीठ, जिरे आणि चिमूटभर हिंग घालून एक ग्लास चाळ प्या. हे पेय तुम्हाला रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमधून बरे होण्यास आणि तुमची त्वचा ताजी दिसण्यास मदत करेल.

सणासुदीच्या काळात चमकणारी त्वचा राखण्यासाठी टिप्स काय आहेत?

हायड्रेटेड रहा, पार्ट्यांपूर्वी केळी खा आणि रात्री उशिरा होणाऱ्या कार्यक्रमांनंतर चाळ प्या. या सोप्या टिप्स तुम्हाला सणासुदीच्या काळातही चमकणारी त्वचा राखण्यास मदत करू शकतात.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More