जाड रहा, खुश रहा... लठ्ठपणा असणं हाच खरा फिटनेस; हार्वर्डचा आगळावेगळा रिसर्च वाचला का?

वजन कमी न करताही तुम्ही हेल्दी आयुष्य जगू शकता. रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 17, 2025, 04:32 PM IST
जाड रहा, खुश रहा... लठ्ठपणा असणं हाच खरा फिटनेस; हार्वर्डचा आगळावेगळा रिसर्च वाचला का?

आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत की, जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर वजन कमी करणे आवश्यक आहे. पण हार्वर्ड आणि बेन गुरियन विद्यापीठाच्या ताज्या अभ्यासात काही वेगळेच सांगितले आहे. या अभ्यासानुसार, वजन कमी न करताही तुम्ही निरोगी राहू शकता. फक्त काही मूलभूत गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. म्हणून आज आपण या मूलभूत गोष्टींचे विश्लेषण करू. वजन कमी न करताही एखादी व्यक्ती फिट कशी राहू शकते आणि दीर्घ आयुष्य कसे जगू शकते हे आपल्याला कळेल.  पण आधी हा अहवाल पहा

 वजन कमी करा, तरच तुमचे आरोग्य सुधारेल असं सगळीकडे सांगितलं जात असताना हार्वर्ड टी.एच. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ (Harvard T.H. Chan School of Public Health) आणि बेन गुरियन विद्यापीठाच्या  (Ben Gurion University) अलीकडील अभ्यासाने ही विचारसरणी बदलली आहे. नवीन अभ्यासानुसार, वजन कमी न करताही तुम्ही तुमचे आरोग्य चांगले हेल्दी बनवू शकता आणि पूर्णपणे निरोगी राहू शकता.

या रिसर्चमध्ये इस्राइलच्या 761 लोकांचा समावेश असून या लोकांच्या पोटाजवळ लठ्ठपणा अधिक आहे. ज्याला विसरल फॅट म्हटलं जातं. रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या लोकांना जवळपास 18 ते 24 महिने वेगवेगळ्या प्रकारे डाएट प्लान फॉलो केला. ज्यामध्ये लो फॅट डाएट, लो कार्ब डाएट, मेडिटेरिनियन डाएट, ग्रीन मेडिटेरेनियन डाएटचा समावेश आहे. 

या अभ्यासात सहभागी असलेल्या 36% लोकांनी आपल्या शरीरातील 5% हून अधिक वजन कमी केलं. 36 टक्के ने 5 टक्क्यांपर्यंत वजन कमी केलं. तसेच 28% लोक ज्यांनी वजन कमी केलं नाही तर उलट त्यांचं वजन आणखी वाढलं. तसेच त्यांच्या आरोग्यातही सकारात्मक बदल पाहायला मिळालं आहेत. यामध्ये चांगल्या कोलेस्ट्रॉलची वाढ झाली, भूक वाढवणारे हार्मोन्स कमी झाले, विसरल फॅट कमी झाले, यासारखे सकारात्मक बदल पाहायला मिळाले. 

भारतासारख्या देशात जिथे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग झपाट्याने वाढत आहेत, तिथे हा अभ्यास खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण देशात संपूर्ण लक्ष वजन कमी करण्यावर असते आणि जर वजन कमी झाले नाही तर लोक चिंता काळजी करतात. 

मात्र या अभ्यासातून समोर आले आहे की,  फक्त वजन कमी करण्यामागे धावू नका. संतुलित आणि पौष्टिक आहार तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. वजनात कोणताही बदल झाला नाही तरी तुमचे शरीर आतून निरोगी होऊ शकते.