का आणि कधी येते उचकी? जाणून घ्या तिला थांबवण्याचे उपाय
उचकी येताना का होतो आवाज... कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे?
मुंबई : कोणालाही उचकी आली, की अरे व्वा.... कोणीतरी आठवण काढली वाटतं... असं अगदी सर्रास म्हटलं जातं. असं असेलही. पण, यामागची काही महत्त्वाची कारणं जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. चला तर मग, जाणून घेऊया उचकी का येते...
फुफ्फुसांत हवा भरल्यामुळे येते हुचकी...
वैद्यकिय तज्ज्ञांच्या मतानुसार आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा फुफ्फुसांत हवा जाते. ज्यामुळे छाती आणि पोटामध्ये कंपन होतं.
यादरम्यान ते आकुंचन पावतात. अनेकदा या थरथराटामुळे श्वास घेण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो आणि उचकी येते.
तिखट अन्नामुळेही येते उचकी
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अनेकदा तिखट पदार्थांच्या सेवानाने उचकी येते. योग्य पद्धतीने अन्न न चावता ते चुकिच्या पद्धतीने गिळल्यामुळेही उचकी येऊ शकते.
अनेकदा जेवल्यानंतर गॅसेसचा त्रास असल्यासही पोट जास्त भरलं की, उचकी येण्यास सुरुवात होते.
गळ्यातून येतो आवाज...
जेव्हा उचकी येते तेव्हा विचित्र आवाज होतो. हा आवाज आपल्या स्वरग्रंथींशी निगडीत असतो. डायाफ्रामच्या आकुंचनाने शरीरातील वोकल कॉर्ड्स काही क्षणांसाठी बंद होतात.
परिणामी उचकी येताना आवाज होतो. अनेकदा यामुळे कित्येकांना अडचणी होतात.
उचकी रोखण्यासाठीचे उपाय
बर्फाइतक्या थंड पाण्याचे 9-10 घोट उचकी आल्यास प्यावेत. शिवाय अतिशय हळुवारपणे दीर्घ श्वास घ्यावा. यादरम्यान एखादी पिशवी फुगवावी.
जेणेकरुन शरीरातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढून जास्त ऑक्सिजनसाठी डायाफ्राम कॉन्ट्रॅक्टला आणखी खोल करु शकतो. लक्षात घ्या इथे प्लास्टिक पिशवीचा वापर करु नका. पेपर बॅगचा वापर करा.
उचकी आल्यास कोणत्याही आरामदायी ठिकाणी बसा. गुडघे छातीच्या दिशेनं आणा आणि दोन मिनिटांसाठी तशाच अवस्थेत ठेवा.
गुडघे मागे घेतल्यानं छाती आकुंचन पावते ज्यामुळे उचकी काही क्षणांत थांबू शकते.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)