Low Blood Sugar Level: या कारणांनी होऊ शकते ब्लड शुगर कमी

हायपोग्लासेमिया म्हणजेच लो ब्लड शुगर एक धोकादायक स्थिती मानली जाते.

Updated: Jun 13, 2021, 01:06 PM IST
Low Blood Sugar Level: या कारणांनी होऊ शकते ब्लड शुगर कमी title=

मुंबई : हायपोग्लासेमिया म्हणजेच लो ब्लड शुगर एक धोकादायक स्थिती मानली जाते. ब्लड शुगर लेवल लो होणं मधुमेह ग्रस्त रूग्णांमध्ये दिसून येते. अशावेळी रूग्णांना इन्सुलिन वाढवण्याची औषधं दिली जातात. बरीच औषधं घेणं, जेवण टाळळं, नेहमीपेक्षा कमी अन्न खाणं किंवा जास्त व्यायाम करणं या व्यक्तींसाठी रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

ब्लड शुगर ग्लूकोज म्हणून देखील ओळखली जाते. ग्लूकोज अन्नातून येते आणि शरीरासाठी उर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून काम करते. मात्र ब्लड शुगर कमी का होते याचं कारण तुम्हाला माहित आहे का?

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्ती उपचार घेत असतात. यामध्ये इन्सुलिनचं उत्पादन वाढवणाऱ्या इंजेक्शन तसंच औषधांचा समावेश असतो. जर रूग्ण अशा प्रकराच्या औषधांचं अधिक सेवन करत असेल तर ब्लड शुगर कमी होण्याची शक्यता असते. 

शरीरामध्ये पुरेश्या प्रमाणात ग्लुकोज नसेल तर शरीर समान्य कार्य नाही करू शकत. ब्लड शुगर लो होण्याची इतर काही कारणं

काही विशिष्ट औषधं

हेपेटायटिस किंवा किडनीचे विकार

एड्रेनल ग्रंथीची कमतरता

अतिरिक्त इन्सुलिन तयार करणारा ट्यूमर

रक्तातील ब्ल शुगर लो झाल्यानंतर ही लक्षणं दिसून येतात

नजर धुरकट होणं

हृदयाची गती वाढणं

अचानक मूड बदलणं

भीती वाटणं

थकवा

डोकेदुखी

घाम येणं

झोप न लागणं