मुंबई : तुम्ही बर्‍याच लोकांकडून ऐकले असेल की, ते म्हणतात की सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी पाणी प्यावे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी दररोज सकाळी पाणी प्यावे, असे मानले जाते. तसेच दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे असे देखील सांगितले जाते. परंतु यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे विचार करणारे लोक येतात. एक म्हणजे सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिणे फायदेशीर आहे. तर काही म्हणतात ब्रश केल्यानंतर पाणी प्यावे. परंतु या दोघांपैकी योग्य पद्धत कोणती? हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यामागील सत्य काय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे मानले जाते की, ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास तुमची पचनशक्ती वाढते. म्हणजेच या काळात जे काही खावे ते सहज पचवले जाईल. बहुतेक लोकांना रात्रीच्या वेळी तहान लागते आणि रात्री उठून पाणी प्यावे लागते. वास्तविक, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचे शरीर पाण्याचा वापर करते, ज्यामुळे तुम्हाला रात्री कधी कधी तहान लागते. त्यामुळे सकाळी उठून पाणी प्यावे, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.


परंतु असे मानले जाते की, जर तुम्ही ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायले, तर तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ शकत नाहीत. या दरम्यान तुमचे तोंड जंतूमुक्त होईल. याशिवाय सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. जर तुम्हाला लवकर सर्दी होत असेल, तर तुम्ही सकाळी नक्कीच पाणी प्यावे. एवढेच नाही तर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा आणि केस चांगले राहतात.


इतकंच नाही तर तुम्हाला हाय ब्लडप्रेशर आणि शुगरची तक्रार असेल, तर रिकाम्या पोटी पाणी प्यायलं तरी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायले तर तुम्ही लठ्ठपणाची समस्या देखील टाळू शकता.


होय, तुम्हालाही वजन कमी करायचे असेल किंवा करायचे असेल तर सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.