मुंबई :  ओले केस ठेऊन झोपल्याने सकाळी उठल्यावर ते अधिक गुंतण्याची शक्यता असते. पण या सोबतच ओले केस घेऊन झोपल्याने डोकं जड होण्याची किंवा सर्दी होण्याची भीतीही अनेकांना असते. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का ? 


खरंच होते का सर्दी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरात व्हायरसचा प्रवेश झाल्यानंतर सामान्य सर्दी होते. त्यामुळे rhino virus च्या संपर्कात आल्यानंतर सर्दीचा त्रास होतो. साधारण थंड प्रदेशात, वातावरणात rhino virus ची वाढ होते. त्यामुळे  ओल्या केसांमुळे थेट  सर्दी होण्याची शक्यता कमी असते. हा एक गैरसमज आहे. 


वातावरण अतिशय थंड असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. वातावरण खूप थंड असेल तर केस टॉवेलने पुरेसे कोरडे करा. केस ओले असताना झोपल्याने सर्दी होत नाही. मात्र अशावेळी तुम्ही सर्दी असलेल्या व्यक्तीच्या आसपास असाल तर नक्कीच तुम्हांला सर्दी होण्याची शक्यता अधिक असते. 


 थंड वातावरणात ओले केस घेऊन बाहेर पडल्याने त्रास होणार नाही. तसेच सर्दी-खोकल्याचा त्रास होणार नाही. जर तुमच्या आसपासच्या लोकांना सर्दी- खोकल्याचा त्रास असेल तर सर्वसाधारण काळजी घ्या. स्वच्छता पाळा. यामुळे तुम्हांला इन्फेक्शन होण्याचा त्रास कमी होतो.