अ‍ॅथलिट सेक्सविषयी मोकळेपणाने बोलताना म्हणाली...

रशियाची ऑलिम्पिक चॅम्पियन एला शिशकिना जगातील टॉप अॅथलिट्सपैकी एक मानली जाते. 

Updated: Aug 19, 2021, 01:40 PM IST
अ‍ॅथलिट सेक्सविषयी मोकळेपणाने बोलताना म्हणाली...

मुंबई : रशियाची ऑलिम्पिक चॅम्पियन एला शिशकिना जगातील टॉप अॅथलिट्सपैकी एक मानली जाते. सध्या एला चर्चेत आलीये ते तिच्या एक्सरसाईजमुळे. एला सेक्सला फिजीकल एक्सरसाईजचा एक उत्तम पर्याय मानते. एलाच्या म्हणण्याप्रमाणे, स्पोर्ट्च्या मैदानात आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मॅचच्या पूर्वी सेक्सला प्राधान्य देते.

एलाने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं. एलाने सिंक्रोनाईज्ड पोहण्यात भाग घेतला होता आणि यापूर्वी तिने 2016च्या रिओ ऑलिम्पिक आणि 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये देखील गोल्ड मेडल्स जिंकली होती. एला रशियन न्यूज आउटलेट स्पोर्ट्स एक्सप्रेसशी तिच्या फील्ड परफॉर्मेंसबद्दल बातचित केली.

ती म्हणाली की, मला विज्ञान, संशोधन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मी माझ्या डॉक्टर डेनिसशी याबद्दल बोलले. वैज्ञानिक कम्युनिटीचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला थोड्याच वेळात तुमच्या व्यावसायिक खेळात पूर्ण ताकदीने सतत कामगिरी करायची असेल तर सेक्स फायदेशीर ठरतं.

ती पुढे म्हणाली, जर मैदानावरील तुमची कामगिरी चढ -उतारांनी भरलेली असेल तर मी कदाचित सेक्सला प्राधान्य देणार नाही. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या शरीरानुसार निर्णय घ्यावा. तसंच तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर या रूटीनला तुम्ही फॉलो करू शकता.

स्पर्धेपूर्वी विदआउट आर्गेस्म सेक्स केल्यामुळे स्नायूंची ताकद वाढू शकते. या व्यतिरिक्त, टेस्टोस्टेरॉन कोणत्याही खेळाडूच्या स्पोर्ट्स अग्रेशनसाठी देखील उपयुक्त आहे. मॉस्कोमध्ये जन्मलेल्या एलाने यापूर्वीही स्पोर्ट्स, सेक्स आणि फिटनेसबद्दल आपलं मत शेअर केलं होतं.