)
पावसाळ्यामध्ये उष्णतेपासून सुटका होते पण सातत्याने वातावरणामध्ये ओलावा पाहायला मिळतो. पावसाळ्यात गारवा असल्यामुळे आराम मिळतो पण बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही तेवढाच वाढतो. पावसामध्ये वातावरण बदलते त्यामुळे अनेक सर्दी, खोकला त्याचबरोबर पोट दु:खीसारखे आजार होत असतात. पावसाळा सुरु झाला की सुरुवातीपासूनच अनेकांना अस्वस्थता आणि खाज जाणवते, पावसाळ्यामध्ये गजकर्ण आणि पुरळ यामुळे त्वचेच्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पण या आजारांसाठी एकच कारण नाही, यासाठी हवेतील आर्द्रता, ओले कपडे, घाम आणि दीर्घकाळ ओलसर त्वचा हे बुरशीच्या वाढीसाठी आजारांमध्ये भर पाडतात.
अनेकांना पावसाळ्यामध्ये गजकर्ण, खाज आणि ॲथलीट रॅशचे त्रास सातत्याने होत असतात. त्यामुळे काही गोष्टींची बारकाईने लक्ष देणे आणि स्वतःला बुरशीजन्य संसर्गापासून वाचवणे गरजेचे आहे. बुरशीजन्य संसर्गाची लक्षणे कोणकोणती आहेत यासंदर्भात सविस्तर सांगायचे झाले तर, त्वचेवर लाल पुरळ येणे, शरीरावर तीव्र खाज, अंगावर जळजळ होणे, त्वचेची सालपटं निघणे, त्वचेवर गोल आकाराचा पुरळ किंवा मुरुमे येणे आणि पायाच्या बोटांमधील त्वचा पांढरी किंवा भेगाळलेली असणे अशी अनेक लक्षणे ही तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकतात.
ओले कपडे ताबडतोब बदलणे
पावसाळ्यामध्ये जोरात पाऊस असल्यामुळे सातत्याने आपले कपडे ओले होत असतात. जास्त वेळ ओले कपडे घालणे टाळा, कारण त्यामुळे आपली त्वचा देखील फुगते. यामुळे त्वचेवर ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे बुरशी वाढू शकते.
हे ही वाचा
पावसाळ्यामध्ये घट्ट कपडे घालणे टाळा
पावसाळ्यामध्ये घट्ट आणि जाड कपडे घालणे टाळले पाहिजे, त्याचे कारण म्हणजेच कारण घट्ट कपड्यांमुळे बुरशीजन्य संसर्गाचा धोका दुप्पट होतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सुती आणि सैल कपडे घालणे हा पर्याय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.
त्वचा कोरडी ठेवणे गरजेचे
पावसाळ्यामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस किंवा बाहेरच्या सहवासामध्ये असल्यास शरीर सातत्याने ओले राहते. त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग बहुतेकदा ओलाव्यामुळे होतो. अशावेळी तुम्ही तुमची त्वचा आणि शरीर हे कोरडे ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये भिजल्यास, तुमचे शरीर ताबडतोब कोरडे करा.
खोबरेल तेलाने मालिश करा
दररोज किंवा आंघोळीनंतर खोबरेल तेलाने मालिश करा. डोक्याच्या आणि शरीराच्या प्रत्येक भागाला तेल लावा. त्यात कापूर मिसळणे उत्तम. या दोन्ही गोष्टींमुळे संसर्गाचा धोका कमी होईल.
अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.