Weight loss : वेळीच सावध व्हा! तुमच्या या सवयीमुळे वाढतोय पोटाचा घेर!

वजन कमी करायचं आहे तर आहारासोबत लाईफस्टाईल म्हणजेच जीवनशैलीतही बदल करावे लागतील.

Updated: Jun 10, 2021, 06:28 PM IST
Weight loss : वेळीच सावध व्हा! तुमच्या या सवयीमुळे वाढतोय पोटाचा घेर!

मुंबई : जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे तर आहारासोबत लाईफस्टाईल म्हणजेच जीवनशैलीतही बदल करावे लागतील. वेळेवर जेवण जेवल्यानंतर पचन शक्ती मजबूत होण्यास होते. त्याचप्रमाणे मेटाबॉलिझम बुस्ट करण्यासाठीही वेळेवर जेवलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर एक तासाच्या आत खाणं खाल्लं पाहिजे. त्याचप्रमाणे रात्री लवकर हलकं जेवणं जेवल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. तर दुसरीकडे असं मानलं जातं की, रात्री उशीरा जेवल्याने वजनवाढीची समस्या उद्भवते. जाणून घेऊया यामध्ये किती सत्यता आहे.

उशीरा जेवणं आरोग्यासाठी हानिकारक कसं ठरतं?

या ठिकाणी वेळेचा मुद्दा नाही. मात्र खाण्याची आवड आणि खाण्याचं प्रमाण यामुळे वजन वाढतं. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण यामध्ये जास्त वेळ  
असेल तर व्यक्ती रात्री जास्त प्रमाणात जेवते. गरजेपेक्षा जास्त जेवल्याने कॅलरीजची प्रमाण जास्त होतं.

दुसरी गोष्ट म्हणजे रात्री उशीरा लोकांना अनहेल्दी म्हणजेत आरोग्यासाठी फारसं चांगलं नसलेलं खाणं खाण्यास आवडतात. याचं कारण म्हणजे तुम्ही दीर्घकाळ उपाशी राहता आणि मग जास्त अनहेल्दी खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी आपण कार्बोनेटेड ड्रिंक्स, सॉल्टी स्नॅक्स तसंच गोड खाणं पसंत करतो आणि याच पदार्थांमध्ये अधिक कॅलरीज असतात. परिणामी तुमच्या वजनामध्ये वाढ होते. 

रात्री उशीरा खाल्ल्यावर असं होतं नुकसान

अनहेल्दी खाणं केवळ तुमचं वजन वाढवत नाही तर आरोग्याच्याही अनेक तक्रारी समोर येतात. रात्री जास्त आणि फॅट्स असलेले पदार्थ खाल्ल्याने अपचन, गॅस तसंच इतर पोटाच्या समस्या उद्भवतात. शिवाय रात्रीच्या वेळी पोटफुगीचा त्रास होऊन झोप न येण्याचीही तक्रार येऊ शकते. 

वजन कमी करण्यासाठी काय करावं?

वजन कमी करण्यासाठी हे गरजेचं नाही की तुम्ही लवकर जेवण घेतलं पाहिजे. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी 2 तास अगोदर जेवलं पाहिजे. यामुळे अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होतं आणि तुमची झोपही पूर्ण होते. याशिवाय कॅलरी काऊंटवरही तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.