का येतात आंबट उलट्या? पाहा यामागची कारणं आणि त्या थांबवण्याचा उपाय
हायपर एसिडिटी टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता
मुंबई : अनेक वेळा विनाकारण ढेकर येताना तोंडात पाणी आंबट पाणी आल्याचं जाणवतं. हा एक आम्लयुक्त पदार्थ असतो ज्यामुळे तुमच्या तोंडाची चव खराब होते. पचनशक्ती ठीक नसेल तर आंबट ढेकर येणं, आंबट उलट्या होणं अशा समस्या उद्भवू लागतात. याचं कारण जास्त गरम अन्न, आंबट पदार्थांचं अतिसेवन, जंक फूडचे सेवन हे असू शकतं.
यामुळे हायपर एसिडीटी होण्याचा धोका असतो. हायपर एसिडिटी टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
आंबट उल्ट्या का होतात?
ज्या व्यक्ती वेळेवर जेवत नाहीत त्यांना आंबट उलट्या किंवा हायपर अॅसिडिटीचा त्रास जास्त होतो. याशिवाय ज्या व्यक्तींची पचनशक्ती कमकुवत असते, त्यांनाही अशा समस्या होण्याची शक्यता असते. याशिवाय मसालेदार अन्न, जंक फूड, आंबट पदार्थांचे सेवन, अति गरम अन्न यामुळे हायपर अॅसिडिटीची समस्या देखील आंबट उलट्या होण्याचं कारण असू शकतं.
आंबट उलट्यांना कसं टाळाल?
गोड दहीचं सेवन
जर तुम्हाला आंबट उलट्या किंवा आंबट ढेकर वारंवार येत असतील तर अशा स्थितीत गोड दह्याचं सेवन करावं. गोड दह्याचे सेवन केल्याने पोटाला थंडावा मिळतो. यासोबतच आंबट उलट्या आणि ढेकर येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
नारळ पाणी प्या
पित्ताचा त्रास अधिक होत असल्यास नारळाच्या पाण्याचा आहारात समावेश करा. सकाळी रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायल्याने आंबट ढेकर आणि आंबट उलटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
आहारात फळांचा समावेश करा
हायपर एसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आहारात फळांचा आणि त्याचसोबत भाज्यांचा समावेश करा. खासकरून दुपारच्या वेळी आपल्या आहारात मोसमी, डाळिंब यांसारख्या फळांचा नक्कीच समावेश करा.