Hip Fat : हिप फॅट काही केल्या कमी होत नाहीये, घरच्या घरी करा `हे` 4 उपाय
जाणून घेऊया या सोप्या टीप्स कोणत्या आहेत.
मुंबई : लठ्ठपणा आणि चरबी यामुळे अनेकजण सध्या त्रस्त आहेत. शरीरात चरबी बहुतेक पोट आणि कंबरेजवळ जमा होते, ज्यामुळे व्यक्ती लठ्ठ दिसू लागते. या चरबीमुळे जुने कपडेही घट्ट होतात आणि सर्वात जास्त वैताग तेव्हा येतो जेव्हा आपली जुनी जीन्स आपल्याला होत नाही.
अशा परिस्थितीत, काही फॅट बर्निंग टिप्स आणि व्यायाम आहेत ज्याचा तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत. तुमच्या लठ्ठपणाची समस्या देखील दूर होईल. जाणून घेऊया या सोप्या टीप्स कोणत्या आहेत.
हिप्स फॅट कमी करण्यासाठी टिप्स
कोर एक्सरसाइज
कोर एक्सरसाइजमध्ये, पोटावर खूप जोर दिला जातो आणि त्यामुळे कंबर आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. यासाठी तुम्ही खाली झोपा आणि आपले पाय पुढे मागे हलवा. हे 20 वेळा 3 सेटमध्ये करा. त्यामुळे कंबरेवरील फॅट कमी होतं.
स्कवॅट्स
कंबर, मांड्या आणि पाय टोन करण्यासाठी स्क्वॅट्स करा. हा एक प्रभावी शरीराचा व्यायाम आहे जो करणं देखील सोपं आहे. दररोज किमान 10 रिप्स आणि 5 सेट करा.
बॅलन्स एक्सरसाइज
बॅलन्स एक्सरसाइज देखील हिप फॅट कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी सरळ उभं राहून हात वर करा आणि एक पाय दुसऱ्या पायाच्या मांड्याजवळ ठेवून उभं राहण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत या स्थितीत उभं राहा.
प्रोटीनचं सेवन
व्यायामासोबतच आहाराकडेही लक्ष द्या. प्रोटीनयुक्त पदार्थ चरबी कमी करण्यासाठी प्रभावी असतात कारण यामुळे पोट जास्त काळ भरलेलं राहतं. शिवाय तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. अंडी, नट्स, चिकन आणि कडधान्यं हे प्रोटीनचा चांगला स्रोत आहेत.