Anti Aging Fruits : वय वाढणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. वय जसजसं वाढतं, तसतशी आपल्या शरीराची ताकद, त्वचेची लवचिकता आणि इम्युनिटी थोडी कमी होऊ लागते. पण चांगली गोष्ट ही आहे की, योग्य आहाराच्या मदतीनं आपण यावर थोडंफार नियंत्रण ठेवू शकतो.
40 शीत आल्यानंतर शरीराची जास्त काळजी आणि पोषणाची गरज असते. काही फळं अशी आहेत, जी रोज खाल्ली तर वाढत्या वय जसं की त्वचेवरील सुरकुत्या, थकवा, चिडचिडेपणा हे उशिरा दिसतात. चला तर मग पाहूया अशी 5 फळं जी तुम्हाला तरुण आणि ताजंतवानं ठेवू शकतात.
संत्रं हे व्हिटॅमिन C चा खजिना आहे. यामुळे त्वचा टाईट राहते आणि सुरकुत्या लवकर येत नाहीत. त्यात असलेले फ्लेवोनॉइड्स आणि पोटॅशियम तुमचं रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. रोज एक संत्रं खाल्लं तरी त्वचेचा ग्लो टिकतो.
डाळिंबमध्ये पॉलीफेनॉल आणि अँथोसायनिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला लवचिक बनवतात आणि सांधेदुखी कमी करतात. व्हिटॅमिन C चा पुरवठा करून डाळिंब शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो आणि सुरकुत्या कमी करतं.
केळं हे पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 चं उत्तम स्रोत आहे. त्यामुळे ते हृदय, हाडं आणि मसल्ससाठी फायदेशीर ठरतं. याशिवाय, व्हिटॅमिन B6 मूड स्विंग्स कमी करतं आणि सतत थकवा वाटू देत नाही. नैसर्गिक साखरमुळे दिवसभर उर्जा मिळते.
आव्होकाडोमध्ये हेल्दी फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स) असतात, जे हार्मोन्स बॅलन्स ठेवतात आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करतात. फाइबरमुळे पचन सुधारते आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचा दीर्घकाळ तरुण दिसते.
हेही वाचा : शरीरात मॅग्नेशियमची कमतरता? 'या' 4 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
पपईमध्ये पपेन नावाचा एन्जाइम असतं, ज्यामुळे पचन क्रिया सुधारते. त्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन A आणि C असतं. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्ली, तर शरीराला पोषण चांगल्या पद्धतीने मिळतात.
(Disclaimer - प्रिय वाचक, ही बातमी वाचल्याबद्दल धन्यवाद. ही बातमी फक्त माहिती देण्यासाठी लिहिली आहे. हे लिहिताना आम्ही घरगुती उपचार आणि सामान्य माहितीची मदत घेतली आहे. 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही. आरोग्याशी संबंधित माहिती स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.)