उन्हाळ्यात सगळ्यांनाच आवडेल हे कलिंगडाचे सरबत
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. `आला उन्हाळा तब्येत सांभाळा,` असा कानमंत्र सतत आपल्याला मिळत असतो. त्याकरता काय करावे. या बाबतचे सल्ले सतत तज्ज्ञांकडून मिळत असतात. त्याचा अवलंब केल्यास आपलीच तब्येत छान टवटवीत, ताजीतवानी राहू शकते.
मुंबई : उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. 'आला उन्हाळा तब्येत सांभाळा,' असा कानमंत्र सतत आपल्याला मिळत असतो. त्याकरता काय करावे. या बाबतचे सल्ले सतत तज्ज्ञांकडून मिळत असतात. त्याचा अवलंब केल्यास आपलीच तब्येत छान टवटवीत, ताजीतवानी राहू शकते.
होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागते. भारतासारख्या देशात उन्हाळा अतिशय कडक असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
यावेळी शीतपेयांचे सेवन करण्याऐवजी घरगुती फळांचा ज्यूस, नारळपाणी,लिंबू सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे यांचे सेवन करणे उत्तम..उन्हाळ्यात कलिंगडांचाही सीझन असतो. त्यामुळे या सीझनमध्ये तुम्ही कलिंगडाचाही ज्यूस घेऊ शकता.
साहित्य - एक कलिंगड, एक चमचा लिंबाचा रस, दोन मोठे चमचे साखर, बर्फाचे तुकडे
कृती
सर्वात आधी कलिंगडाची साले काढून फोडी करुन घ्या. फोडीमधील बिया काढा.
एका मिक्सरमध्ये कलिंगडाच्या फोडी, लिंबाचा रस आणि साखर टाकून मिक्स करा.
जोपर्यंत सरबत होत नाही तोपर्यंत बारीक करा.
सरबत तयार झाल्यास याला गाळणीने गाळून घ्या.
तयार आहे कलिंगडाचा सरबत. यात बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.