Weight Loss Tips : रिकाम्या पोटी 'हे' काम केल्याने एका महिन्यात Belly Fat होणार कमी

बेली फॅटमुळे त्रस्त असाल तर, नियमित एक महिना 'या' गोष्टी करा, Belly Fat वाढण्याचे कारण म्हणजे...   

Updated: Sep 3, 2022, 08:03 AM IST
Weight Loss Tips : रिकाम्या पोटी 'हे' काम केल्याने एका महिन्यात Belly Fat होणार कमी title=

मुंबई : फक्त महिलाच नाही तर, पुरुष देखील Belly Fat मुळे त्रस्त असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाची जीवनशैली प्रचंड बदलली आहे. त्यामुळे रोज व्यायाम आणि वेळेत आहार घेता येत नाही. त्यामुळे Belly Fat वाढतो आणि अनेक पोटाचे विकार देखील उद्भवतात.  बेली फॅट कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण करतो.  एवढंच नाही तर उकळलेलं पाणी, ग्रीन टी, व्यायाम असे अनेक उपाय आपण बेली फॅट कमी करण्यासाठी करतो. पण बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही जर काही गोष्टी एक महिना नियमित केलात, तर बेली फॅट कमी होण्याची शक्यता आहे. पण बेली फॅट कमी करण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.. (Weight Loss Tips) 

सायकल 
सायकलिंग हा बेली फॅट कमी करण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. सायकल चालवल्याने तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि कॅलरीज बर्न करण्याची क्षमता सायकलिंगमुळे वाढते. सायकलिंग केल्याने मांड्या आणि कंबरेचे वजन कमी होण्यास मदत होते.

चालणे (Walking)
एक अतिशय सोपा कार्डिओ व्यायाम जो तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो. जर तुम्ही बेली फॅट कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर संतुलित आहारासोबत चालणे  (Walking)  उत्तम मार्ग आहे. रोज तीस मिनिटं ताज्या हवेत चालल्यामुळे देखील बेबी फॅट कमी होऊ शकतो. 

झुंबा (Zumba)
झुंबा वर्कआउट हा हाईइंटेंसिटीचा व्यायाम आहे. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी झुंबा उत्तम पर्याय आहे. झुंबा केल्यामुळे मन देखील प्रसन्न राहतं. 

क्रंचेस (Crunches)
पोटाची चरबी कमी (Belly Fat) करण्यासाठी क्रंचेस एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम करताना सुरुवातीला जमिनीवर झोपावे. त्यानंतर गुडघे वाकवून समांतर वर उचलावे. दोन्ही पायांमध्ये फार अंतर ठेवू नये. दोन्ही हात डोक्याच्या मागच्या बाजूला ठेवून पोटातून वर उठावे, त्यानंतर गुडघ्याच्या दिशेने पुढे जावे. शक्य असेल तर डोके गुडघ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. पण पाय उचलले जाणार नाही याची काळजी घ्यावी. साधारण 10 ते 15 वेळा व्यायाम (workout)केल्याने बेली फॅट कमी होईल. 

Belly Fat वाढण्याचे कारण..

- उशीरा जेवणं रात्री उशीरा जेवणं... आणि जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं... यासारखी दुसरी वाईट सवय नाही. तुमच्या शरीरासाठी ही अत्यंत घातक सवय आहे. खाल्यानंतर लगेचच झोपल्यानं तुमच्या शरीरातील फॅटस् जास्त प्रमाणात वाढतात. तुम्ही अॅक्टीव्ह असताना घेतलेला पोषक आहार कॅलरीज लवकर बर्न करू शकतो... त्यानंतर तुम्ही आरामात झोपू शकता. 

- अल्कोहोलचं जास्त प्रमाणात तुमच्या पोटाच्या वाढलेल्या घेरामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण असू शकतं. यामुळे तुम्हाला सारखं भूक लागल्यासारखं वाटून तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाऊ शकता. 

- न्याहारी टाळणं जास्त खायचं नाही म्हणून तुम्ही न्याहारी म्हणजेच तुमचा सकाळचा नाश्ता टाळत असाल तर मोठी चूक करताय. दिवसाची सुरुवात तुमच्या पौष्टीक अन्नाने व्हायला हवी. नाश्ता टाळल्यानं तुमची चयापचयाची गती मंदावते.